Imran Khan: इम्रान खान यांना जडलाय गंभीर आजार? अंधत्व येण्याची शक्यता, डॉक्टर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:57 IST2026-01-30T11:54:49+5:302026-01-30T11:57:19+5:30

Imran Khan Health Update: गेल्या अनेक महिन्यापांसून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.

Imran Khan undergoes eye procedure in hospital, remains in good health, party says | Imran Khan: इम्रान खान यांना जडलाय गंभीर आजार? अंधत्व येण्याची शक्यता, डॉक्टर काय म्हणाले?

Imran Khan: इम्रान खान यांना जडलाय गंभीर आजार? अंधत्व येण्याची शक्यता, डॉक्टर काय म्हणाले?

गेल्या अनेक महिन्यापांसून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. इम्रान खान यांना सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लुजन नावाचा गंभीर आजार जडला असून वेळत योग्य उपचार न मिळाल्यास त्यांच्या डोळ्यांची दृष्टी कायमची जाण्याची भिती त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे. या बातमीनंतर रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू केली.

इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान यांनी एक्सवर माहिती दिली की, त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांची स्थिती गंभीर आहे. सीआरव्हीओमुळे डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. जर वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर त्यांना कायमचे अंधत्व येऊ शकते. इम्रान खान यांच्या प्रकृतीची बातमी समजताच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी, इम्रान खान यांचे पर्सनल डॉक्टर आणि हजारो कार्यकर्ते अदियाला तुरुंगाबाहेर जमा झाले.

इम्रान खान यांच्या पर्सनल डॉक्टरांना त्यांना भेटू द्यावे, अशी मागणी प्रशासनाने फेटाळल्यामुळे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी स्वतः धरणे आंदोलनाला बसले. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. खुर्रम आझम मिर्झा यांच्या मते, ही स्थिती उच्च रक्तदाब किंवा प्रचंड मानसिक तणावामुळे उद्भवू शकते. तुरुंगात पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुग्णालयात उपचार करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत योग्य वेळी उपचार न झाल्यास मोतीबिंदू होण्याची दाट शक्यता असते, असेही मिर्झा म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारीच्या रात्री इम्रान खान यांना कडक सुरक्षेत इस्लामाबादमधील पीआयएमएस रुग्णालयात नेण्यात आले होते, तिथे त्यांच्यावर २० मिनिटांची एक शस्त्रक्रिया करण्यात आली. माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी स्पष्ट केले की, खान यांच्या लेखी संमतीनंतरच हे उपचार करण्यात आले असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, इम्रान खान यांनी तुरुंगातून लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर टीका केल्यानंतर, त्यांच्या बहिणींना त्यांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. ४ डिसेंबरपासून त्यांची कुटुंबाशी भेट झालेली नाही. 

Web Title : इमरान खान की तबीयत बिगड़ी; डॉक्टरों ने अंधा होने का खतरा बताया।

Web Summary : इमरान खान सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लूजन से पीड़ित हैं, इलाज न होने पर अंधापन हो सकता है। उनके बेटे ने चिंता जताई, जिससे अदियाला जेल के बाहर विरोध प्रदर्शन हुए। डॉक्टरों का कहना है कि उच्च रक्तचाप या तनाव कारण हो सकता है, अस्पताल में इलाज की आवश्यकता है। इस्लामाबाद में उनका इलाज हुआ और अब सुधार हो रहा है।

Web Title : Imran Khan's health worsens; risk of blindness, say doctors.

Web Summary : Imran Khan suffers from Central Retinal Vein Occlusion, potentially causing blindness if untreated. His son raised concerns, leading to protests outside Adiala jail. Doctors suggest high blood pressure or stress may be the cause, requiring hospital treatment. He received treatment in Islamabad and is now improving.