शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:27 IST

ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी  रियो डी जेनेरियोमध्ये जवळपास २,५०० ब्राझिलियन पोलीस आणि सैनिकांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या गँगवर छापा टाकला आणि ८१ जणांना अटक केली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात किमान ६० जणांचा आणि चार पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या कारवाईत एकूण ६४ जणांचा मृत्यू झाला.

रिओ राज्य सरकारच्या मते, ही कारवाई एका वर्षाहून अधिक काळापासून नियोजित होती आणि त्यात २,५०० हून अधिक लष्करी आणि नागरी पोलीस अधिकारी सहभागी होते. सुरक्षा दलांनी गँगच्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक भागांना वेढा घातला आणि आत घुसले, ज्यामुळे गोळीबार सुरू झाला. ६४ लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कमीतकमी ८१ जणांना अटक केली आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कारवाई सुरू असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. सीएनएनच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान ४२ रायफल देखील जप्त केल्या. राज्य सरकारने म्हटलं आहे की, गँगच्या सदस्यांनी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांना टार्गेट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा आरोप आहे. पेन्हा कॉम्प्लेक्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी गुन्हेगारांनी ड्रोनचा वापर केला.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने  रियो डी जेनेरियोमधील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांच्या छाप्याचं वर्णन भयानक असं केलं. रियो डी जेनेरियोमधील एका फावेला येथे सुरू असलेल्या पोलीस कारवाईमुळे आम्ही घाबरलो आहोत, ज्यामध्ये चार पोलीस अधिकाऱ्यांसह ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आम्ही अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो आणि त्वरित आणि प्रभावी चौकशीची विनंती करतो असंही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rio de Janeiro Police Raid: 64 Dead, Dozens Arrested

Web Summary : A Rio de Janeiro police operation targeting drug gangs resulted in 64 deaths, including four officers. Over 2,500 police and soldiers raided gang-controlled areas, leading to intense gunfire. Eighty-one individuals were arrested during the operation, which had been planned for over a year.
टॅग्स :Brazilब्राझीलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूDrugsअमली पदार्थ