इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:58 IST2026-04-19T12:58:28+5:302026-04-19T12:58:28+5:30

Israel News: आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र तत्त्वांचे उल्लंघन करणारे हे पाऊल एक धोकादायक पायंडा पाडू शकते, असे सांगत १६ मुस्लिम देशांनी इस्रायलला इशारा दिला.

a decision by israel about somalia sparked a new controversy 16 Muslim countries were outraged gave a big warning | इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!

इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!

Israel News: कतार, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कस्तानसह १६ अरब आणि इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी दोहा येथे एक संयुक्त निवेदन जारी करून सोमालीलँडमध्ये इस्रायलने राजनैतिक प्रतिनिधीच्या नियुक्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला. इस्रायलचा हा निर्णय सोमालियाच्या संघराज्याच्या सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक अखंडतेचे थेट उल्लंघन आहे, असे या देशांनी म्हटले आहे. 

आपल्या निवेदनात, मुस्लिम देशांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र तत्त्वांचे उल्लंघन करणारे हे पाऊल एक धोकादायक पायंडा पाडू शकते. केवळ सोमालियाच्या कायदेशीर राज्य संस्थाच लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करतात, असेही या देशांनी स्पष्ट केले आहे. कतार, कुवेत, सौदी अरेबिया, इजिप्त, सोमालिया, सुदान, लिबिया, बांगलादेश, अल्जेरिया, पॅलेस्टाईन, तुर्कस्तान, इंडोनेशिया, पाकिस्तान, मॉरिटानिया, जॉर्डन आणि ओमान या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्रांची एकता कमकुवत करणाऱ्या कोणत्याही एकतर्फी पावलांना विरोध केला.

१६ देशांचा सोमालियाच्या एकतेला खंबीर पाठिंबा

संयुक्त निवेदनात भर देण्यात आला की, इस्रायलचा निर्णय आफ्रिकन युनियनच्या घटनात्मक कायद्याचे उल्लंघन करतो. अशा कृतींमुळे आफ्रिका प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि प्रादेशिक शांतता व सुरक्षेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशारा देशांनी दिला. या १६ देशांनी सोमालियाच्या एकतेला आपला खंबीर पाठिंबा पुन्हा व्यक्त केला.

दरम्यान, इस्रायलच्या कृतीमुळे तीव्र राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम देशांचा असा युक्तिवाद आहे की, ही एकतर्फी कृती सोमालियाच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप असून जागतिक स्तरावर ती स्वीकारली जाणार नाही. इस्रायलच्या या कृतीमुळे या प्रदेशात सुरू असलेल्या शांतता प्रयत्नांना बाधा येऊ शकते, असे सांगून त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सोमालियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले.

 

Web Title : इस्राइल के सोमालिलैंड कदम से आक्रोश; 16 मुस्लिम देशों का विरोध।

Web Summary : सोमालिलैंड में राजनयिक नियुक्त करने के इस्राइल के फैसले ने विवाद खड़ा कर दिया है, जिससे 16 मुस्लिम देशों ने निंदा की है। वे इसे सोमालिया की संप्रभुता का उल्लंघन और क्षेत्रीय स्थिरता के लिए खतरा मानते हैं, सोमालिया की क्षेत्रीय अखंडता और एकता का सम्मान करने का आग्रह करते हैं।

Web Title : Israel's Somaliland move sparks outrage; 16 Muslim nations protest.

Web Summary : Israel's decision to appoint a diplomat to Somaliland has ignited controversy, drawing condemnation from 16 Muslim nations. They view it as a violation of Somalia's sovereignty and a threat to regional stability, urging respect for Somalia's territorial integrity and unity.