शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारे रेशनचे २२ क्विंटल धान्य पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव परिसरातून एका पिकअप वाहनातून रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव परिसरातून एका पिकअप वाहनातून रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून ४ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किशोर पोटे, सपोउपनि बालाजी बोके, शंकर ठोंबरे, राजू ठाकूर, किशोर सावंत, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने लिंबाळा नर्सी ना. ते कडती रोडवरील कयाधू नदीच्या समोरील सिमेंटच्या पुलाजवळ एका पिकअप वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात गहू व तांदूळ आढळून आला. हे धान्य रेशनचे असल्याची खात्री झाल्यानंतर वाहन नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात लावण्यात आले. यात तपासणी केली असता यात २५ हजार १६० किमतीचे १२ क्चिंटल ५८ किलो वजनाचे गव्हाचे २४ पोते तसेच २० हजार ६०० रुपये किमतीचे १० क्विंटल ३० किलो वजनाचे तांदळाच्या २० पाेत्यासह ३ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात पोना राजूसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून चालक अनिल मच्छिंद्र कढणे (रा. मोहजा, ता. रिसोड),राम कळसाईकर (रा. नर्सी ना.), सलीम (पूर्ण ना. माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय करीत आहेत. तपासात रेशनचे धान्य कुठून आणले, कोठे नेले जाणार होते याची माहिती समोर येणार आहे.