शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणी मागण्याच्या कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:13 IST

शहरात गणपतीची वर्गणी मागण्याच्या कारणावरून एका मेडिकल व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : शहरात गणपतीची वर्गणी मागण्याच्या कारणावरून एका मेडिकल व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे सेनगाव शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.गणपतीची वर्गणी का देत नाही या कारणावरून सेनगाव येथील मुख्य रस्त्यावरील श्री गणराज मेडिकलचे व्यावसायिक अमोल शिंदे यांना युवकांच्या एका टोळक्याने जबर मारहाण केली. काही वेळाने यातून दोन गटांत वाद होऊन लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. हाणामारीच्या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. हाणामारी जवळपास अर्धा तास सुरू होती. त्यामुळे याठिकाणी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याप्रकरणी दोन्ही गटांतील तक्रारींवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. नासधूस केलेल्या मेडिकल दुकानाला पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्री गणेशाच्या स्थापनेपूर्वीच वर्गणी मागण्यावरून झालेल्या हाणामारीने शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे आगामी काळात अशा घटना घडू नयेत, याकरिता शांतता समितीच्या बैठका, विनापरवाना गणेश मंडळांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीस