शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! प्रेमात अडसर ठरल्याने प्रेयसीच्या बहिणीचा गळा कापून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:52 IST

प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यानेच आरोपीने ब्लेडने गळ्यावर सपासप वार करून मुलीस ठार केले. 

ठळक मुद्देमृत मुलीच्या मोठ्या बहिणीच्या प्रियकराने दिली कबूली

हिंगोली : तालुक्यातील नांदुसा येथे एका बारा वर्षीय मुलीचा गळा चिरून निर्घृन खून केल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अखेर या खूनाचा उलगडा झाला असून गावातीलच एका युवकाने प्रियंका शिवाजी कांबळे या मुलीचा खून केल्याची कबूली दिली. मयत प्रियंकाची मोठी बहिण स्नेहासोबत सदर युवकाचे प्रेमसंबंध होते. परंतु मयत प्रियंका ही प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यानेच आरोपीने ब्लेडने गळ्यावर सपासप वार करून प्रियंकाला ठार केले. 

हिंगोली तालुक्यातील नांदुसा येथील शिवाजी कांबळे यांची १२ वर्षांची मुलगी प्रियंकाचा आरोपी बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याने निर्घृन खून केला. कांबळे कुटंूबिय शेतात काम करण्यासाठी गेले होते, तेव्हा प्रियंका आणि तिचा सहा वर्षाचा भाऊ आशिष हे दोघेजण घरीच होते. याच दरम्यान बालाजी उर्फ गोपाल आडे याने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने आशिषच्या हातात मोबाईल देऊन त्यास घराबाहेर एका झाडाखाली बसविले. आणि प्रियंकाचा गळा चिरून खून केला. काही वेळाने मयत प्रियंकाची मोठी बहिण स्नेहा ही घरी आली. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती तिने आई वडिलांना दिली. त्यानंतर शिवाजी कांबळे व त्यांच्या पत्नी घरी धावत आले. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आई व वडिलांनी एकच आक्रोश केला. 

निर्दयता ! हिंगोलीतील नांदुसा येथे १२ वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी रामेश्वर वैंजणे, सपोनि राजेश मलपिलू सपोउपनि मगन पवार, प्रवीण राठोड, सचिन गोर्ले हे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी खूनी कोण? याचा शोध घेतला. परंतु याबाबत ठोस माहिती पोलिसांना मिळत नव्हती. घटनास्थळी रक्ताने माखलेली ब्लेड त्यांना आढळुन आली होती. बासंबाठ ठाण्याचे सपोउपनि मगन पवार यांनी तपासाची चक्रे फिरवत मयत मुलीचा भाऊ आशिषला विश्वासात घेत माहिती विचारली. तसेच यावेळी मयत मुलीच्या  वडीलांचे सांत्वन करणारा आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याच्या नखावर रक्ताचे डाग असल्याचे सपोउपनि पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले. त्यामुळे अधिकच संशय बळावला. पोलिसांनी त्यास विश्वासात घेत ठाण्यात आणले व कसून चौकशी केली. 

यावेळी आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याने मयत मुलीची मोठी बहिण स्नेहा हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. परंतु मयत प्रियंका ही आम्हा दोघांच्या प्रेमात अडसर ठरत होती, म्हणून मी तिचा खून केला अशी कबूली आरोपीने दिली. याप्रकरणी मयत मुलीचे वडील शिवाजी कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. परंतु हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MurderखूनAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी