निर्दयता ! हिंगोलीतील नांदुसा येथे १२ वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 07:49 PM2020-05-21T19:49:15+5:302020-05-21T19:52:36+5:30

हिंगोली जिल्ह्यात हृदय पिळवून टाकणारी घटना

Cruelty! 12-year-old girl strangled to death at Nandusa in Hingoli | निर्दयता ! हिंगोलीतील नांदुसा येथे १२ वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून

निर्दयता ! हिंगोलीतील नांदुसा येथे १२ वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून

googlenewsNext
ठळक मुद्देमृत मुलगी जि. प. शाळेत सहाव्या वर्गात शिकायला होती. आई वडील शेतात गेल्याने घरात एकटी होती

हिंगोली / कळमनुरी : तालुक्यातील नांदुसा येथे एका बारा वर्षीय मुलीचा गळा चिरून निर्घृन खून केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मयत मुलीचे नाव प्रियंका शिवाजी कांबळे असून गावातील जि. प. शाळेत सहाव्या वर्गात शिकायला होती. 

हिंगोली तालुक्यातील नांदुसा येथील शिवाजी कांबळे  यांना दोन मुली व दोन मुले आहेत. २१ मे रोजी कांबळे कुटंूबिय शेतात काम करण्यासाठी गेले होते. तर घरी प्रियंका कांबळे (१२) आणि आशिष कांबळे (४) हे दोघेजण घरीच होते. परंतु या दरम्यान आशिष हा घराबाहेर खेळत असताना एका अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून प्रियंकाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मयत प्रियंकाची मोठी बहिण स्नेहा ही घरी आली. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच तिने हंबरडा फोडला. शेतात जाऊन याबाबत आई वडिलांना माहिती दिली. काही वेळातच शिवाजी कांबळे व त्यांच्या पत्नी घरी आले. प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहताच यावेळी  आई व वडिलांनी एकच आक्रोश केला. परंतु हा खून कोणी व कोणत्या करणातून केला हे मात्र कळू शकले नाही. मयत प्रियंकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले जात होते. याबाबत पोलिसांना मिळताच घटनास्थळी डीवायएसपी  रामेश्वर वैंजणे, सपोनि राजेश मलपिलू आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना ब्लेड आढळुन आली आहे. त्यामुळे प्रियंकाचा खून धारदार ब्लेडने केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रियंकाचा निर्दयीपणे गळा चिरून हत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. 

योग्य दिशेने तपास केला जाईल
पोलीस अधीक्षक योगेश कुमार म्हणाले सदर घटनेचा योग्य दिशेने तपास केला जाईल. शवविच्छदनानंतरच अधिक माहिती मिळेल. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून त्यांनी पंचनामा केला आहे. परंतु आरोपीने हे कृत्य कोणत्या कारणातून केले हे मात्र तपासामध्ये उघडकीस येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Cruelty! 12-year-old girl strangled to death at Nandusa in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.