Hingoli: अवैध दारू विक्री केंद्रावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:14 IST2025-06-12T12:13:08+5:302025-06-12T12:14:28+5:30

या प्रकरणी पाच जणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Hingoli: Attack on police team that went to raid illegal liquor shop | Hingoli: अवैध दारू विक्री केंद्रावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

Hingoli: अवैध दारू विक्री केंद्रावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

वसमत (जि. हिंगोली ): शहरातील सोमवारपेठ भागातील एका घरातील अवैध दारु विक्री केंद्रावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास धक्काबुक्की करण्यात आली. यात महिला पोलीस शिपायास थापडबुक्यांनी मारहाण करुन दुखापत करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध बुधवारी रात्री ११:५० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसमत शहरातील सोमवार पेठ भागात अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांना मिळताच ११ जून रोजी सायंकाळी ५:५० वाजेदरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पथक सोमवार पेठ भागात गेले. अवैध दारु विक्री केंद्रावर छापा टाकत असताना रमेश गणाजी पवार, शांताबाई रमेश पवार, गया रमेश पवार, राणी रमेश पवार, रुपा रमेश पवार ( सर्व रा. सोमवारपेठ, वसमत) यांनी पोलीसांना घरात येण्यास विरोध करत पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. महिला पोलीस शिपाई अंबुताई सखाराम चव्हाण यांना थापड बुक्यांनी मारहाण करुन दुखापत केली. 

या प्रकरणी महिला पोलीस शिपाई अंबुताई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाच जणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ,सपोनि बालाजी महाजन, फौजदार कसबेवाड, इम्रान कादरी,केशव गारोळे, गजानन भोपे आदि करित आहेत.

Web Title: Hingoli: Attack on police team that went to raid illegal liquor shop