चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 11:03 IST2026-05-03T10:50:21+5:302026-05-03T11:03:30+5:30

चेन्नई विमानतळावर, शारजाहून येणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानातील एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडून धावत्या विमानातून उडी मारली. या घटनेमुळे मुख्य धावपट्टी एक तासासाठी बंद ठेवण्यात आली होती.

Thrill at Chennai airport! Passenger jumps from a moving plane; Administration loses sleep | चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप

चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप

शारजाहून चेन्नईला येणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानात आज पहाटे एका पुरुष प्रवाशाने टोकाचे पाऊल उचलले. विमान धावपट्टीवरून टॅक्सीवेकडे जात असताना, या प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

२.७७ लाख 'टुरिस्ट'ची 'परे'ला पसंती गेल्या आर्थिक वर्षात 'टुरिस्ट' तिकिटातून १.३१ कोटींचा महसूल; सुट्टीच्या दिवशी सुविधेचा लाभ

विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान मुख्य धावपट्टी सोडून टॅक्सीवेवर संथ गतीने पुढे जात असताना ही घटना घडली. विमान पूर्णपणे थांबण्यापूर्वीच प्रवाशाने सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत आपत्कालीन गेट उघडले. वैमानिकाने तत्काळ ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली, त्यानंतर CISF च्या जवानांनी तातडीने धाव घेत संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले.

विमानतळ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती बिघडली असावी. "त्याला मळमळत होते आणि विमानात त्याला दोनदा उलट्या झाल्या असाव्यात," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या शारीरिक स्थितीमुळेच प्रवाशाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशाला घेतले ताब्यात

घटनेनंतर लगेचच वैमानिकाने सुरक्षा दलाला सतर्क केले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी तात्काळ प्रतिसाद देत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या घटनेमुळे विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य धावपट्टी पहाटे ३:२३ ते ४:२३ दरम्यान बंद ठेवण्यात आली होती आणि विमानांना दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आले होते.

Web Title : चेन्नई हवाई अड्डे पर हंगामा: चलती विमान से यात्री ने लगाई छलांग

Web Summary : शारजाह से चेन्नई आ रही एयर अरेबिया की एक उड़ान में एक यात्री विमान के टैक्सी करते समय कूद गया। घटना के बाद यात्री को सीआईएसएफ ने पकड़ लिया और पुलिस को सौंप दिया। उड़ान के दौरान यात्री अस्वस्थ था।

Web Title : Chaos at Chennai Airport: Passenger Jumps from Moving Plane

Web Summary : A passenger on an Air Arabia flight from Sharjah jumped from the plane on arrival in Chennai. The incident occurred as the plane was taxiing. The passenger was unwell during the flight. He was apprehended by CISF and handed to police.