Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...

Tilak Varma Wrist Watch, IPL 2026 CSK vs MI: व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 13:00 IST2026-05-03T12:58:05+5:302026-05-03T13:00:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ipl 2026 mi vs csk tilak varma Expensive Watch Flies Off After Mis-Hit Shot video viral | Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...

Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...

Tilak Varma Wrist Watch, IPL 2026 CSK vs MI: यंदाच्या हंगामात मैदानावर मुंबई इंडियन्सची अतिशय सुमार आणि खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. अद्याप त्यांचे सर्व सामने संपलेले नाहीत, पण ९ पैकी ७ सामने गमावल्यामुळे त्यांचा यंदाच्या हंगामातील प्रवास जवळपास संपल्यातच जमा आहे. अशा वेळी चेन्नई विरूद्धच्या सामन्यात एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मासोबत एक वेगळी आणि मजेशीर घटना घडली. फलंदाजी करताना तिलकने मारलेल्या एका जोरदार फटक्यामुळे त्याच्या हातातील महागडं घड्याळ तुटून हवेत उडालं. याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तिलक वर्माचं महागडं घड्याळ हवेत...

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीदरम्यान टिळक वर्मा क्रिजवर होता. एका चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा फटका मारताना बॅट आणि मनगटावर इतका ताण आला की, त्याच्या हातातील महागडं घड्याळ उडालं आणि खेळपट्टीच्या बाजूला जाऊन पडलं. सूत्रांच्या माहितीनुसार, टिळक वर्माने घातलेले हे घड्याळ एका प्रसिद्ध लक्झरी ब्रँडचे असून त्याची किंमत लाखांच्या घरात आहे. फटका चुकल्याने (Mis-hit) झाल्यामुळे हाताला हिसडा बसला आणि त्या हालचालीमुळे घड्याळ मनगटावरून निसटून उडून बाजूला पडलं. याआधीही खेळाडूची बॅट हातून सटकल्याचे अनेकदा पाहिले आहे. पण घड्याळ उडाल्याचं हे पहिल्यांदाच घडलं. त्यामुळे सारेच अवाक् झाले.

तिलक वर्मा यावर काय म्हणाला?

घड्याळ हवेत उडाल्याचे पाहताच तिलक वर्मा स्वतःही काही काळ थक्क झाला. त्याने हसत हसतच ते घड्याळ उचलले आणि मैदानाबाहेर असलेल्या सहकाऱ्यांकडे सोपवले. या घटनेनंतर काही काळ खेळाचा वेग मंदावला होता, मात्र प्रेक्षकांसाठी हा एक मनोरंजक क्षण ठरला. सोशल मीडियावर चाहत्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, "तिलक वर्माचा शॉट इतका पॉवरफुल होता की घड्याळालाही घाम फुटला," तर दुसऱ्याने म्हटले, "मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे घड्याळही त्यांची साथ सोडतेय!"

Web Title : तिलक वर्मा का जोरदार शॉट, महंगी घड़ी हवा में उड़ी!

Web Summary : सीएसके बनाम एमआई आईपीएल मैच के दौरान, तिलक वर्मा के जोरदार शॉट से उनकी महंगी घड़ी कलाई से उड़ गई। वीडियो वायरल हो गया, जिससे प्रशंसक हंस पड़े। वर्मा ने घड़ी उठाई, जिससे मुंबई इंडियंस के संघर्षों के बारे में मजेदार प्रतिक्रियाएं आईं।

Web Title : Tilak Varma's powerful shot sends his expensive watch flying!

Web Summary : During a CSK vs MI IPL match, Tilak Varma's powerful shot caused his expensive watch to fly off his wrist. The incident, caught on video, went viral, amusing fans. Varma retrieved the watch, sparking funny reactions online about Mumbai Indians' struggles.