शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

होतकरु गरीब विद्यार्थ्यांना ‘आदर्श’मध्ये मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:44 IST

जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. दररोजच्या जेवणाचा खर्चही पालकांना झेपावत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातून आलेल्या ३६ गरीब विद्यार्थ्यांचा वर्षभराचा जेवणाचा खर्च आदर्श महाविद्यालयाच्या वतीने उचलण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. दररोजच्या जेवणाचा खर्चही पालकांना झेपावत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातून आलेल्या ३६ गरीब विद्यार्थ्यांचा वर्षभराचा जेवणाचा खर्च आदर्श महाविद्यालयाच्या वतीने उचलण्यात आला आहे.हुशार असतानादेखील आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन वेळेचा जेवणाचा खर्चही उचलू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची संख्या महाविद्यालयात मोठी आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यात सोडून द्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी नुकतीच संस्थेचे सचिव रामचंद्र कयाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. आदर्श महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी २३ तर रामचंद्र कयाल यांनी १३ विद्यार्थ्यांचा खर्च उचलला. अशा एकूण ३६ विद्यार्थ्यांच्या वर्षभराचा जेवणाचा खर्च उचलण्याचा निर्णय झाला. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मेसला प्रत्येक महिन्याचा खर्च प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात येणार आहे. प्राध्यापक व कर्मचारी दर महिन्याला आपल्या पगारातून ५०० रुपये या उपक्रमासाठी देणार आहेत. मुलगा १४०० व मुलीसाठी ८०० रुपये प्रती महिन्याला देण्यात येणार आहे. शहरातील दानशुरांनी या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन आदर्श महाविद्यालयातर्फे केले आहे.दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अर्थकरणावर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या खर्च झेपत नसल्याने हतबल झाले आहेत. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून टीसी काढण्यासाठी अनेक विद्यार्थी महाविद्यालयात येत असत. आदर्श महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही बाब संस्थेच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्यासाठी काय करता येईल, याविषयी नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात ३६ विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेचे सचिव राम कयाल यांनी सांगितले. बैठकीला प्राचार्य बी.डी. वाघमारे, उपप्राचार्य डॉ. विलास आघाव, प्रा. एल.एम. सामलेटी, ओ.एस. इंदाणी, डॉ. आर.आर. पिंपळापल्ले, डॉ. पी.टी. गंगासागरे, वर्षा सावतकर, प्रा. एस.एल. पराती, डॉ. पी.डी. आचोले, मेजर पंढरीनाथ घुगे आदी उपस्थित होते.कयाल यांनी घेतली १३ विद्यार्थ्यांचा जबाबदारीआदर्श महाविद्यालयाचे सचिव राम कयाल हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. यापूर्वी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी रेफ्रिजरेटरसह पाईपलाईन करुन दिली. तसेच जलेश्वर मंदिरास सभामंडपासाठी निधी दिला. यासह शहरातील विविध सामाजिक कार्यात मदतीसाठी त्यांचा पुढाकार असतो. या उपक्रमात त्यांनी सर्वात मोठा वाटा उचलला असून एकट्याने १३ विद्यार्थ्यांचा जेवणाचा खर्च उचलला आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र