शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 19:54 IST

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला.

ठळक मुद्दे२२ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या दरम्यान काळवीटाचा मृत्यू २३ डिसेंबर दुपारी २ वाजेपर्यंत मृतावस्थेतील काळवीट रस्त्याच्या कडेला पडून

आखाडा बाळापूर : नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरच पडलेल्या काळविटाचा मृतदेह पोलिसांनी रस्त्याकडेला हलविला. पण वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी नॉटरिचेबल असल्याने मृत्यूनंतर २० तासापर्यंत मृतदेह जागेवरच पडुन होता.

आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय जवळच नांदेड - हिंगोली रोडवर २२ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या दरम्यान काळवीट रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने काळवीट जागीच मरण पावले. काही ग्रामस्थांना मृतावस्थेतील काळवीट दिसल्यानंतर बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला. ठाणेदार रवी हुंडेकर, बीट जमादार संजय मार्के, विठ्ठल जाधव घटनास्थळी आले. काळवीट मोठे असल्याने त्याला उचालून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु वन विभागाच्या अधिकारी प्रज्ञा सावळे यांनी फोन उचललाच नाही. इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले फोन बंद करून ठेवण्यातच शहाणपण समजले.

परिणामी दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मृतावस्थेतील काळवीट रस्त्याच्या कडेला तेथेच पडून होते. कुत्र्यापासून नागरिकांना व पोलिसांना या काळविटाचे संरक्षण करावे लागले. परंतु याबाबत कुठलीही गंभीरता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवली नाही. दुपारी अडीच ते तीन वाजता वनसेवक कऱ्हाळे हजर झाले. पोलिसांनी काळविटाचा मृतदेह वनविभागाच्या स्वाधीन केला. वनविभागाची वन्य प्राण्या विषयी असलेली अनास्था टीकेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीforestजंगलDeathमृत्यू