शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे तुम्हाला एका तासात येऊ शकतो स्ट्रोक, वेळीच ओळखा 'ही' लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:10 IST

आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळले की ज्यांना स्ट्रोकचा झटका आला त्यापैकी बहुतेक लोक स्ट्रोकच्या एक तास आधी खूप रागावलेले होते किंवा नैराश्यात गेले होते.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, तुम्हाला जर राग येत असेल तर हे ब्रेन स्ट्रोकचे कारण असू शकते. अभ्यासात असे म्हटले आहे की, राग आणि जास्त शारीरिक श्रमामुळे व्यक्तीला स्ट्रोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचदा अनहेल्दी लाईफ स्टाईलमुळे लोकांना अनेक मानसिक आजार उद्भवतात. ज्यामुळे लोकांना लवकर राग येतो आणि ते स्वत: कधी-कधी असे का वागतात हे त्यांचं त्यांना देखील कळत नाही.

आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळले की ज्यांना स्ट्रोकचा झटका आला त्यापैकी बहुतेक लोक स्ट्रोकच्या एक तास आधी खूप रागावलेले होते किंवा नैराश्यात गेले होते. या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

मेंदूला ऑक्सिजन मिळत नाहीस्ट्रोक आल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते. दोन्ही प्रकरणांमध्ये पुरेसा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही. याचा परिणाम असा होतो की मेंदूची क्रिया कार्य करू शकत नाही आणि अर्धांगवायूचा धोका देखील असतो.

स्थिती घातक असू शकतेग्लोबल इंटरस्ट्रोक स्टडीचा भाग असलेल्या या संशोधनामध्ये, गंभीर स्ट्रोकच्या १३ हजार ४६२ प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. आयर्लंडसह ३२ देशांचा या अभ्यासात सहभाग होता. आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जे लोक जास्त शारीरिक श्रम करतात त्यांनाही स्ट्रोकचा धोका असतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्ट्रोक आलेल्या प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती खूप शारीरिक श्रम करत असे.

एनयूआय गॅलवे येथील क्लिनिकल एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख अँड्र्यू स्मिथ यांच्या मते, "प्रगत तंत्र असूनही, स्ट्रोकचा धोका नेमका कशामुळे जास्त आहे सांगणे कठीण आहे. आमच्या अभ्यासात, कोणत्या घटकांमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला."

३० टक्के धोका वाढलाअँड्र्यू स्मिथ म्हणाले की, "संशोधनात असे आढळून आले की, भावनिक त्रासामुळे स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी वाढतो. हे देखील आढळून आले की जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांना पक्षाघाताचा धोका ६० टक्के जास्त असतो."

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स