वजन कमी करण्याच्या नावावर बोलल्या जातात 'या' ४ खोट्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 03:27 PM2019-08-23T15:27:42+5:302019-08-23T15:39:15+5:30

लठ्ठपणामुळे वेगवेगळे आजार आपोआप तुम्हाला जाळ्यात घेतात. डायबिटीस, हाय बीपी, हृदयरोग असे वेगवेगळे आजार तुम्हाला होतात.

Lies about weight loss pills one should never believe | वजन कमी करण्याच्या नावावर बोलल्या जातात 'या' ४ खोट्या गोष्टी!

वजन कमी करण्याच्या नावावर बोलल्या जातात 'या' ४ खोट्या गोष्टी!

Next

(Image Credit : newsmax.com)

लठ्ठपणामुळे वेगवेगळे आजार आपोआप तुम्हाला जाळ्यात घेतात. डायबिटीस, हाय बीपी, हृदयरोग असे वेगवेगळे आजार तुम्हाला होतात. या समस्यांमुळे आज अनेकजण हैराण आहेत. अनेकांना वजन कमी करायचं आहे. त्यासाठी ते वेगवेगळे पर्याय वापरत असतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे सल्लेही दिले जातात. पण त्यातील काही सल्ले जो दावा करतात तो पूर्णपणे खोटा असतो. तो कसा हे पुढीलप्रमाणे जाणून घेऊ...

विना डाएट वजन कमी करा

(Image Credit : www.gaiam.com)

हे सर्वात मोठं खोटं आहे. वजन कमी करण्याचा दावा करणारे प्रॉडक्ट तुम्हाला हे सांगतात. मुळात विना डाएट वजन कमी करणे किंवा नियंत्रित करणे शक्य नाही. तुम्ही अनेकदा वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या औषधांबाबत ऐकलं असेल. पण त्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. कारण गोळ्या किंवा पावडर घेऊन वजन कमी केलं जाऊ शकत नाही. वजन कमी करण्यासाठी डाएट महत्वाचीच आहे. कोणत्याही गोळ्यांनी किंवा पावडरने शरीरातील फॅट पूर्णपणे दूर केलं जाऊ शकत नाही. आणि कॅलरी कमी केल्याशिवायही वजन कमी केलं जाऊ शकत नाही.

एक्सरसाइज न करता वजन करा कमी

(Image Credit :healthline.com)

जर एखादी कंपनी एक्सरसाइज न करता वजन कमी करण्याचा दावा करत असेल तर समजून घ्या की, ते खोटं बोलत आहेत. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करणे फार महत्वाचं आहे. तुम्ही एक्सरसाइज जिममध्ये जाऊन करा किंवा घरी करा, एक्सरसाइज महत्वाची आहे. शारीरिक अ‍ॅक्टिविटी न करता कोणतीही व्यक्ती वजन कमी करू शकत नाही.

मेटाबॉलिज्म वाढवा

(Image Credit : thezoereport.com)

अनेक सप्लीमेंट तयार करणाऱ्या कंपन्या दावा करतात की, मेटाबॉलिज्म वाढवून वजन कमी करा. पण हे शक्य नाही. कंपनी अशाप्रकारचा दावा त्यांच्या प्रॉडक्टची विक्री वाढवण्यासाठी करतात. त्यामुळे अशा दाव्यांपासून तुम्ही सावध रहायला हवं. मुळात कोणत्याही पावडरने किंवा औषधाने तुमचा मेटाबॉलिज्म वाढवता येत नाही. 

गोळ्या-पावडरने कमी करा वजन कमी

अनेकदा असा दावा केला जातो की, पावडर आणि गोळ्यांनी तुम्हाला भूक लागणार नाही आणि याने तुमचं वजन कमी होईल. पण असं काही नसतं. शरीराला प्रोटीन, फायबर आणि पोट भरण्यासाठी आहाराची गरज असते. आहारात फॅट असतं. वजन कमी करणारे सप्लिमेंट्स कधीच आहाराची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा दाव्यांवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे.

Web Title: Lies about weight loss pills one should never believe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.