शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह होऊन ५ वर्षे झालीत? 'सायलेंट डॅमेज' टाळण्यासाठी करा या चाचण्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:38 IST

Chandrapur : मधुमेह हा असा आजार आहे, जो शरीराच्या प्रत्येक अवयवावर हळूहळू परिणाम करतो. विशेषतः ज्या रुग्णांना मधुमेह होऊन ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांनी केवळ साखरेची पातळी न तपासता शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नियमितपणे तपासणे गरजेचे आहे.

चंद्रपूर : मधुमेह हा असा आजार आहे, जो शरीराच्या प्रत्येक अवयवावर हळूहळू परिणाम करतो. विशेषतः ज्या रुग्णांना मधुमेह होऊन ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांनी केवळ साखरेची पातळी न तपासता शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, किडनी निकामी होणे किंवा अंधत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच योग्य चाचण्या करणे गरजेचे आहे, असा सल्ला कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रदीप वरघणे यांनी केले आहे.

हृदयविकाराचा वाढता धोका

मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते. यासाठी दरवर्षी एकदा डोळ्याची पडदा तपासणी आणि पायांच्या संवेदना तपासणे गरजेचे आहे.

वेळेनुसार चाचण्यांचे नियोजन आवश्यक

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांचे वेळापत्रक पाळणे हिताचे ठरते. दर महिन्याला उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर तपासणे अनिवार्य आहे, तर दर तीन महिन्यांनी 'HbA1c' ही चाचणी करून मागील ९० दिवसांतील साखरेची सरासरी पातळी जाणून घ्यावी. याशिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तपासण्यासाठी दर सहा महिन्यांनी "लिपिड प्रोफाइल' आणि किडनीच्या आरोग्यासाठी 'क्रिएटिनिन' चाचणी करणे आवश्यक आहे.

कौटुंबिक इतिहास असेल तर घ्या काळजी!

कुटुंबात आई-वडिलांना मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकाराचा इतिहास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे 'हेल्थ चेकअप' करून घ्यावे. अनुवांशिक आजारांचा धोका टाळण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

ही आहेत धोक्याची लक्षणे

पायांना सतत मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, दृष्टी धूसर होणे किंवा डोळ्यांचा नंबर वारंवार बदलणे, लघवीच्या प्रमाणात बदल होणे किंवा अंगावर सूज येणे, साखर वारंवार अनियंत्रित होणे.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

"मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेचा आकडा नाही, तर तो संपूर्ण शरीराशी निगडित आजार आहे. ५ वर्षांहून अधिक काळ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. अनेकदा कोणतीही लक्षणे न दिसता हृदय किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो, ज्याला आपण 'सायलेंट डॅमेज' म्हणतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर ३ ते ६ महिन्यांनी लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट आणि गरज पडल्यास ईसीजी करणे आरोग्यासाठी सुरक्षित ठरते.- डॉ. प्रदीप वरघणे, कार्डिओलॉजिस्ट, चंद्रपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Diabetes for 5 Years? Get These Tests to Avoid Silent Damage!

Web Summary : Diabetes patients for over 5 years should regularly check organ function. Neglecting can risk heart issues, kidney failure, or blindness. Timely tests, a healthy lifestyle, and specialist advice are crucial, especially with a family history. Watch for warning signs like numbness, blurred vision, or uncontrolled sugar levels.
टॅग्स :diabetesमधुमेहnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य