शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी बीअरवर बीअर पिता? पाहा 'हा' उपाय खरंच फायदेशीर असतो की फक्त एक गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:45 IST

Why Beer Can Increase Kidney Stone Risk: किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी बीअर प्या, असा एक सल्ला अनेकदा ऐकायला मिळतो. पण खरंच हा उपाय फायदेशीर असतो की हा केवळ गैरसमज आहे? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट...

Why Beer Can Increase Kidney Stone Risk: किडनी स्टोनची समस्या उन्हाळ्यात होण्याचा धोका अधिक असतो. कारण या दिवसात बरेच लोक नकळत कमी पाणी पितात. किडनी स्टोन झाल्यास यात किती वेदना होतात हे अनेकांना माहीत असेलच. किडनी स्टोन बाहेर काढण्याचे लोक वेगवेगळे घरगुती उपाय करतात. सोशल मीडियावर सुद्धा यावरील उपायांचे वेगवेगळे दावे केले जातात. यातीलच एक दावा म्हणजे बीअर प्यायल्याने किडनी स्टोन लवकर बाहेर पडतो. बरेच लोक मित्रांचे किंवा नातेवाईकांचे अनुभव ऐकून ही बाब खरी मानतात. पण एक्सपर्ट सांगतात की, हा एक मोठा गैरसमज आहे आणि यावर विश्वास ठेवणं नुकसानकारक ठरतं. 

फायद्यांऐवजी नुकसान

अनेक हेल्थ एक्सपर्ट स्पष्टपणे सांगतात की, बीअरने किडनी स्टोनचा धोका अजिबात कमी होत नाही. उलट बीअरने शरीरात डिहायड्रेशन वाढू शकतं, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. लोकांना असं वाटतं की, बीअर एक लिक्विड आहे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहणार. पण मुळात अल्कोहोलचा प्रभाव उलटा होतो. अल्कोहोल शरीरात डाययूरेटिकसारखं काम करतं, म्हणजे अल्कोहोल प्यायल्यावर पुन्हा पुन्हा लघवी लागते आणि अशात शरीरातील जास्त पाणी बाहेर पडतं. अशात जर कुणी पुरेसं पाणी पित नसेल तर आणि केवळ बीअर पित असेल तर शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. 

वजन वाढतं आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका

डॉक्टर सांगतात की, डिहायड्रेशनमुळे लघवीतील मिनरल्स एकत्र येऊन स्टोन बनवण्याचा धोका अधिक असतो. याचा अर्थ असा की, ज्याला आपण उपाय समजतो तोच अनेकदा समस्या वाढू शकतो. इतकंच नाही तर एक्सपर्टनुसार, बीअरने डिहायड्रेशन तर वाढतंच, सोबतच शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण देखील वाढतं. हाय यूरिक अॅसिड स्टोन तयार होण्याचं एक मोठं कारण ठरू शकतं. सोबतच जास्त प्रमाणात बीअर प्यायल्याने वजन वाढतं आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोकाही वाढतो. ज्या लोकांना वाटतं की, बीअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडेल, त्यांची तब्येत अल्कोहोलमुळे आणखी बिघडू शकते.

किडनी स्टोनवर सगळ्यात सोपा उपाय

एक्सपर्ट सांगतात की, किडनी स्टोनपासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. दिवसभरातून ८ ते १२ ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरून लघवी घट्ट होणार नाही आणि मिनरल्स जमा होणार नाहीत. किडनी स्टोन टाळायचा असेल तर लिंबू सरबतही फायदेशीर ठरतं. कारण यातील सायट्रेट स्टोन तयार होण्यास रोखतं.

अनेकांना हेही माहीत नाही की, किडनी स्टोन केवळ एका कारणाने होत नाही. खाण्या-पिण्याच्या सवयी, पाणी कमी पिणे, जास्त मीठ, मेटाबॉलिक समस्या आणि जेनेटिक कारणही यामागे असतं. त्यामुळे सोशल मिडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यासाठी योग्य ती मेडिकल मदत घेणं अधिक फायदेशीर ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Beer for Kidney Stones: Myth or Helpful? Expert Advice

Web Summary : Drinking beer to pass kidney stones is a myth. It dehydrates you, increasing stone risk. Water and lemon juice are better preventatives. Consult doctors.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य