शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चाने सालेकसा दणाणले

By admin | Updated: December 8, 2015 02:05 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मोर्चाने सालेकसा दणाणून

सालेकसा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मोर्चाने सालेकसा दणाणून सोडले. पक्षभेद बाजूला ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हा विशाल मोर्चा काढला व शासनाचा निषेध करीत तहसील कार्यालयावर धडक दिली. शासनाकडून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या जात नाहीत, हे शासन संवेदनशून्य झाले आहे असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा सुध्दा काढली. शेतकऱ्यांमधील हा असंतोष पाहून संपूर्ण सालेकसा परिसर दणाणून गेला.या मोर्चाचे नेतृत्व तिरोडाचे माजी आ.दिलीप बन्सोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य दुर्गा तिराले, जिल्हा महासचिव बबलू कटरे, लक्ष्मण नागपुरे, प्रभाकर दोनोडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, माजी सभापती तुकाराम बोहरे, उपसभापती राजकुमार विश्वकर्मा आदीनी केले. मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यानंतर काही नेत्यांनी मागण्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. शेवटी तहसीलदार प्रशांत सांगळे यांना मुख्यमंत्र्याच्या नावाचे निवेदन देण्यात आले. मोर्चात गोपाल तिराले, मनोज विश्वकर्मा, निर्दोष साखरे, दौलत अग्रवाल, पप्पू राणे, पूजा वरखडे, ओमप्रकाश पारधी, रविंद्र चुटे, रामेश्वर पंधरे, विनोद अग्रवाल, संतोष नागपुरे, सुरेश मच्छिरके, मनोज शरणागत आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)अशा आहेत मागण्या -प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करावे.स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना धान्य देण्यात यावे.शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ करावेउन्हाळी धान पीकासाठी पाणी द्यावेलक्षवेधी मोर्चा आणि प्रेतयात्रामोर्चाच्या सुरूवातीला मुस्लीम कब्रस्तान परिसरात तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी महिला-पुरूष एकवटले आणि विशाल मोर्चा काढीत पोलीस स्टेशन, बाजार चौक, गांधी चौक, बस स्टॅन्ड, पंचायत समिती, वनविभाग चौकावरून मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. सोबतच कब्रस्तानवरून शासनाची प्रतिकात्मक शवयात्रासुध्दा काढण्यात आली. अंत्ययात्रेनंतर अग्निसंस्काराचा कार्यक्रमही घेण्यात आला. यामुळे संपूर्ण सालेकसावासी व आठवडी बाजारात आलेले लोक चकीत झाले.