शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी

By अंकुश गुंडावार | Updated: September 10, 2024 11:22 IST

Flood In Gondia City: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती.

 गोंदिया -  जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती.

शहरातील फुलचूर परिसरात नाल्यालगत असलेले एक घर कोसळल्याने त्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तर देवरी तालुक्यातील लोहारा येथील नाल्यात एक ट्रक वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. गोंदिया, देवरी, सालेकसा, आमगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर पुजारीटोला, कालीसरार, सिरपूरबांध धरणाचे सर्व दवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाने आरेंज अलर्ट दिला आहे. धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. या चारही तालुक्यातील दहा ते पंधरा मार्ग बंद झाले आहे. तर प्रशासनाने नदी काठालगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात बिकट पूर परिस्थिती निर्माण होवू शकते.

शेकडो घरांची पडझडजिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. तर सालेकसा आणि देवरी तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी साचल्याने सामानांचे सुध्दा नुकसान झाल्याची माहिती आहे.

गोंदिया शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणीनगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांचा उपसा न केल्याने सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. तर अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र होते. 

टॅग्स :floodपूरRainपाऊसVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र