Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:05 IST2026-04-23T14:04:00+5:302026-04-23T14:05:54+5:30

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर २१ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा आणि लग्नासाठी तिचे अपहरण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकी घटना काय वाचा...

Gondia Crime: Minor girl kidnapped for marriage, tied hands and feet, kept in school, saying 'I will kill you' | Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण

Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण

Gondia Crime: माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना तिरोडा तालुक्यात उघडकीस आली. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका नराधमाने गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेचे हात-पाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी (२२ एप्रिल) उघडकीस आला आहे. या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

दवनीवाडा पोलिसांनी आरोपी सुमित देवानंद ऊईके (२१) याच्याविरुद्ध 'पोक्सो'सह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध

तिरोडा तालुक्यातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके हे एकाच गावातील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात ओळख होती. तीन महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही. 

घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले आणि तिचे अपहरण केले. त्याने तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेले.

मुलीला म्हणाला, '...नाहीतर जिवे मारेन'

तिथे 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवे मारेन' अशी धमकी देत लग्नासाठी दबाव टाकला. पीडितेने ठामपणे नकार दिला असता, आरोपीने कुरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेचे तोंड, हात आणि पाय ओढणीने घट्ट बांधून तिला त्याच खोलीत बंद केले आणि स्वतः तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी शाळा उघडण्यात आल्या तेव्हा हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

आरोपी फरार, पथके घेताहेत शोध

दवनीवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १३७ (२), १४२, ६४(१), ३५१(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक वैशाली ढाले यांनी फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पथक तयार करून आरोपीचा शोध चालवला आहे.

Web Title : गोंदिया: नाबालिग लड़की का अपहरण, बलात्कार, शादी से इनकार पर कैद

Web Summary : गोंदिया में, एक नाबालिग लड़की को शादी से इनकार करने पर अपहरण और बलात्कार किया गया। आरोपी ने उसे बांधकर एक स्कूल में बंद कर दिया। पुलिस ने मामला दर्ज किया; आरोपी फरार है।

Web Title : Gondia: Minor Girl Abducted, Raped, Imprisoned for Refusing Marriage

Web Summary : In Gondia, a minor girl was abducted and raped after refusing marriage. The accused tied her up and locked her in a school. Police have registered a case; the accused is absconding.