शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

धावती बस पेटली

By admin | Updated: December 15, 2015 01:50 IST

बोरीवलीवरून ठाण्याकडे येणाऱ्या एसटीच्या सेमी लक्झरी बसला घोडबंदर रोडवरील कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर अचानक आग लागली, परंतु चालकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे

ठाणे : बोरीवलीवरून ठाण्याकडे येणाऱ्या एसटीच्या सेमी लक्झरी बसला घोडबंदर रोडवरील कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर अचानक आग लागली, परंतु चालकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे बसमधील १९ प्रवाशांचे प्राण वाचले. ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.सकाळी १० च्या सुमारास ही बस ठाण्याहून बोरीवलीला गेली होती. त्यानंतर १२.३० च्या सुमारास पुन्हा ती परतीच्या प्रवासात घोडबंदरला कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर आली असता, इंजिन मधून धूर येत असल्याचे चालक शिवाजी डोंगरेंच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस घेऊन १८ प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर बसमधील आग विझविण्याच्या बाटल्याने ती विझविण्याचादेखील प्रयत्न केला, परंतु आगीने अधिक भडका घेतला. सुदैवाने चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर तिने पेट घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दल आणि महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले, परंतु तोपर्यंत ती जळून खाक झाली होती. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. टेम्पोला अचानक आगदुसऱ्या घटनेत सव्वाएकच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशेने एसीचे कॉम्प्रेसर घेऊन निघालेल्या टॅम्पोला तीनहात नाक्यावरील ब्रिजजवळ अचानक आग लागली. त्याच्या मागील बाजूस ठेवलेल्या कॉम्प्रेसरच्या ठिकाणी ही आग लागली. चालक टेम्पो घेऊन जात असताना, त्याच्या बाजूने जाणाऱ्या वाहन चालकांनी टेम्पोच्या मागील बाजूने धूर येत असल्याची माहिती त्याला दिली.त्यानुसार त्याने आपले वाहन बाजूला उभे केले, परंतु मागील बाजूस असलेले दरवाजे उघडणे त्याला शक्य झाले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचाऱ्यांनी दरवाजाचे लॉक तोडून ती आटोक्यात आणली, परंतु या घटनेतही टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यातही कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.