शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

शेळ मेळावली प्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी भूमिका स्पष्ट करावी: कॉंग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 8:51 PM

शेळ-मेळावली येथिल प्रस्तावित आयआयटीला होणारा गांवकऱ्यांच्या विरोध प्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करुन भूमिपुत्रांचा अपमान केल्याचा दावा

मड़गाव - शेळ-मेळावली येथिल प्रस्तावित आयआयटीला होणारा गांवकऱ्यांच्या विरोध प्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करुन भूमिपुत्रांचा अपमान केल्याचा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने केला आहे. मंत्री गोविंद गावडेनी या विषयावर  आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कॉंग्रेसने  केली आहे. "शेळ मेळावलीतील या प्रस्तावित प्रकल्पासाठी आदिवासी लोकांची किती जमीन जात आहे हे तुम्हाला तरी माहित आहे काय असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारणे आणि अजून पर्यंत आपल्या पुढे त्यांचे प्रतिनिधित्व आलेले नाही असे  आदिवासी कल्याण मंत्र्यांनी म्हणणे दुर्देवी आहे असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.शेळ मेळावली येथील आदिवासी समाजाने या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच खुद्द आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांना जुलै २०२० मध्ये या संदर्भातील रीतसर निवेदन दिले आहे असे सांगुन गोविंद गावडे जाणिवपुर्वक त्याकडे  दुर्लक्ष करीत आहेत असे  कॉंग्रेसने म्हटले आहे. गोंयच्या कूळ मुंडकारांचो आवाज आणि गाकुवेध या संघटनांनी या संदर्भात आपला पाठिंबा शेळ मेळावली येथील आदिवासी समाजाला दिला आहे. या प्रकल्पासाठी आदिवासी लोकांचीही जमीन जात असल्यानेच या संघटनानी त्यांना पाठिंबा दिला  आहे हे मंत्री गोविंद गावडे यांना कळत नाही का असा प्रश्न चोडणकर यांनी विचारला आहे. भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी आता लोकांच्या आवाजापुढे वाकून  हा प्रकल्प शेळ मेळावली इथे नकोच असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे व भाजप सरकारला उघडे पाडले आहे. परंतु अपक्ष आमदार असलेले गोविंद गावडे आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याच समाजावर अन्याय करुन सरकारची बाजू घेत असल्याचा  आरोप चोडणकर यांनी केला आहे.आपण एक जबाबदार व्यक्ती असल्याने आपण त्या विषयावर बोलू शकत नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील ते आपल्याला मान्य आहे अशी भूमिका गोविंद गावडे यांनी घेणे हे धक्कादायक असल्याचे चोडणकर म्हणाले. मंत्री गोविंद गावडे शिक्षण क्षेत्रात तज्ञ नसतील, पण आपल्या आदिवासी समाजावर अन्याय होत आहे हे उघड्या डोळ्यानी बघणे हे   योग्य नाही असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा