मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता वापरणार 'इव्ही'; ताफ्यातील वाहन संख्येत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:50 IST2026-05-15T11:49:08+5:302026-05-15T11:50:40+5:30

विविध कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आपल्या वाहनासह सुरक्षेसाठीचे फक्त पोलिस वाहन घेऊन फिरत होते.

cm pramod sawant will now use ev reduction in the number of vehicles in the fleet | मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता वापरणार 'इव्ही'; ताफ्यातील वाहन संख्येत कपात

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता वापरणार 'इव्ही'; ताफ्यातील वाहन संख्येत कपात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: युद्धजन्य स्थिती, इंधन टंचाई या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केल्याची घोषणा गुरुवारी केली. काल विविध कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आपल्या वाहनासह सुरक्षेसाठीचे फक्त पोलिस वाहन घेऊन फिरत होते, तसेच आपण 'इव्ही'चा वापर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'मी माझ्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी त्याचे पालन करावे.' मुख्यमंत्री म्हणाले की, 'इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्यासाठीही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत असून, नागरिकांनीही पारंपरिक इंधनावर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी ऊर्जेकडे वळावे.'

सार्वजनिक वाहतूक वापरा

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे, इंधनाची बचत आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.

पश्चिम आशियातील वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन बचत, परकीय चलन संरक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतःपासून सुरुवात करीत सरकारी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
 

Web Title : मुख्यमंत्री प्रमोद सावंत अब 'ईवी' का उपयोग करेंगे, काफिले में कटौती

Web Summary : प्रधानमंत्री के आह्वान पर मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने अपने वाहन काफिले को कम किया और ईवी का उपयोग करेंगे। उन्होंने नागरिकों से सार्वजनिक परिवहन का उपयोग करने, ईंधन बचाने और पर्यावरण संरक्षण और आर्थिक मजबूती के लिए इलेक्ट्रिक वाहनों को अपनाने का आग्रह किया। यह कदम पीएम मोदी के ईंधन संरक्षण पर जोर देने के बाद उठाया गया है।

Web Title : Chief Minister Pramod Sawant to Use EV, Reduces Fleet Size

Web Summary : Responding to the Prime Minister's call, CM Pramod Sawant reduced his vehicle fleet and will use EVs. He urges citizens to use public transport, save fuel, and embrace electric vehicles for environmental protection and economic strength. This move follows PM Modi's emphasis on fuel conservation.