शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील महिलांची बचत २८ कोटींवर पोहोचली

By admin | Updated: March 8, 2017 02:13 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या ‘महिला समृध्दी बचत ठेव व कर्ज योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार महिलांनी बचत खाते उघडले

६७ हजार महिलांनी उघडले बँक खाते : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महिला समृध्दी; स्वावलंबी बनण्याकडे वाटचाल दिगांबर जवादे   गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या ‘महिला समृध्दी बचत ठेव व कर्ज योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार महिलांनी बचत खाते उघडले असून या खात्यांवर सुमारे २८ कोटी रूपयांची बचत झाली आहे. अशिक्षीत म्हणून हिनविल्या जाणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांनाही बचतीचे महत्त्व कळायला लागले आहे. हे यावरून दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता ग्रामीण व दुर्गम भागात वास्तव्यास आहे. या भागातील जनतेला विशेष करून महिलांना बचतीची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सप्टेंबर २०१५ पासून महिला समृध्दी बचत ठेव कर्ज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे वैयक्तिक बचत खाते उघडण्यास प्राधान्य देण्यात आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन खाते उघडण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. सुरूवातीला टाळाटाळ करणाऱ्या महिलांनी खाते उघडण्यास सुरूवात केली. बँक खात्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर महिलांनीच गावात प्रचार करून इतर महिलांना बँक खाते काढण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरातील सुमारे ६७ हजार महिलांनी खाते उघडले आहेत. त्यांच्या खात्यावर २८ कोटी रूपयांची बचत जमा झाली आहे. हळूहळू बचतीचे महत्त्व या महिलांना कळत चालले असल्याने बचत खात्यावरील बचतीच्या आकड्यात महिन्याला एक कोटी रूपयांची भर पडली आहे. यातील बहुतांश महिलांना बँकेच्या वतीने चेकबूक, एटीएमचे वितरण केले आहे. त्यामुळे या महिला कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली आहे.