शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

By admin | Updated: January 13, 2017 00:42 IST

लाखांदूर मार्गावर देसाईगंज शहरापासून दोन किमी अंतरावर धानाने भरलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात

देसाईगंज : लाखांदूर मार्गावर देसाईगंज शहरापासून दोन किमी अंतरावर धानाने भरलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.४५ वाजता घडली. या अपघातात तीन इसम किरकोळरित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देसाईगंज ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. देसाईगंज येथील धानगंजातून तालुक्यातील सावंगी येथील हरदेव राईसमिलमध्ये ट्रक क्रमांक एमएच ३३-४११७ ने धान वाहून नेत असताना ट्रकच्या चाकाचे पट्टे तुटले व या अपघातात ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला नरेश धनू पोवनकार (४०) रा. आमगाव हा ट्रकखाली दबून जागीच ठार झाला. ट्रकच्या मागच्या भागात बसलेला ईश्वर दिघोरे याला गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा दुपारी मृत्यू झाला. चालक नंदकिशोर रामचंद्र गोटे याला पोलिसांनी अटक केली असून या अपघातात ट्रकवरील हमाल रामू पिलारे (३५) रा. एकलपूर, गोवर्धन कुथे (३५) रा. सोनी जि. भंडारा, भागवत दांभीरकर रा. चपराळ जि. भंडारा हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देसाईगंज रूग्णालयात उपचार सुरू आहेत. धान गंजातून १३० पोत्यांनी भरलेला ट्रक हमालासह सावंगीकडे जात असताना चालकाशी ओळख असलेला नरेश हा आमगावपर्यंत जाण्यासाठी जेजानी पेट्रोलपंपावरून ट्रकमध्ये बसला होता. मात्र त्याचा काही अंतरावरच दुर्दैवी मृत्यू झाला, हे विशेष. (वार्ताहर)