शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट बंद, वर्दळ मात्र चालूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

मुख्य चौकांमध्ये पोलिसांना तैनात केले होते. अधून-मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते कुठे जात आहे, अशी विचारणाही करत होते; पण विविध कारणे सांगून लोक आपली सुटका करून घेताना दिसले. त्यामुळे ड्यूटी करणारे पोलीसही हतबल झाले होते. या लॉकडाऊनमध्ये बँका, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांसाठी ते एक कारण ठरत होते. 

ठळक मुद्देकाेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन सतर्क; अनेक नागरिक मात्र अजुनही बिनधास्त

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या लॉकडाऊनचा पहिला दिवस अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय होता. गेल्यावर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि आताच्या लॉकडाऊनमध्ये काय फरक आहे, या औत्सुक्यातून अनेक जण निव्वळ फेरफटका मारण्यासाठी रस्त्यांवर फिरत होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असली तरी काही भागांत रस्त्यांवरची वर्दळ बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मुख्य चौकांमध्ये पोलिसांना तैनात केले होते. अधून-मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते कुठे जात आहे, अशी विचारणाही करत होते; पण विविध कारणे सांगून लोक आपली सुटका करून घेताना दिसले. त्यामुळे ड्यूटी करणारे पोलीसही हतबल झाले होते. या लॉकडाऊनमध्ये बँका, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांसाठी ते एक कारण ठरत होते. 

न.प.ने केले दुकान सीलसंचारबंदी आणि कोरोनाच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी गुरुवारी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात महसूल, नगर परिषद आणि पोलीस विभागाने इंदिरा गांधी चौक, बस डेपो, गुजरी आणि मार्केट लाइनमध्ये फिरून नागरिक व दुकानदारांना विविध सूचना केल्या. यादरम्यान आठवडी बाजारातील हिमालया वनस्पती आयुर्वेदिक भंडार येथे काही मुले गुटखा व खर्रा विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले. यावेळी बेशिस्त नागरिकांकडून ३४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत मुख्याधिकारी संजीव ओहोळ, अनिल गोवर्धन, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार प्रामुख्याने सहभागी होते.

चामोर्शीत पाच हजारांचा दंड वसूलचामोर्शी : ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधाची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात सुरू झाली. कोरोनाकाळात संचारबंदीचे पालन योग्यरीतीने व्हावे यासाठी  चामोर्शी शहराच्या बालउद्यान चौकाजवळ  पोलीस प्रशासन सज्ज असून गुरूवारी  नियम मोडणाऱ्यांवर कारवाई  करून ४ हजार ८०० रुपयांचा दंड सूल केला आहे. संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी  यासाठी चामोर्शी पोलीस प्रशासन सतर्क झाले. शहरात दिवसभर बँक, ‘अत्यावश्यक सेवा’ मेडिकल आदी  कामांसाठी नागरिक बाहेर येत असतात. बाजारपेठ बंद असून अनावश्यक नागरिक वाहनाने व पायी रस्त्याने फिरतानाही दिसून येत हाेते. त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुल, घोट, गडचिरोली मार्गावरून  ये-जा करणाऱ्या  वाहनधारकांची कसून चौकशी करून  दंडही आकारण्यास सुरूवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, महसूल, नगरपंचायत व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहेत या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस