शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

जंकास संस्था बळकट करू

By admin | Updated: November 3, 2015 00:45 IST

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जंगल कामगार सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आश्वासन : जंगल कामगार संस्थांची वनवृत्त कार्यालयात सभा
गडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जंगल कामगार सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा आहे. या संस्थांवर हजारो नागरिकांचे पोट अवलंबून आहे. त्यामुळे संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करू, असे आश्वासन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आलोक मिश्रा यांनी दिले.
स्थानिक वनवृत्त कार्यालयाच्या सभागृहात २ नोव्हेंबर रोजी २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता जंगल कामगार संस्थांना कामे वितरित करण्याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक बी. जी. सिंह, गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वन संरक्षक कल्याणकुमार, चंद्रपूर वन वृत्ताचे एस. पी. ठाकरे, जिल्हा संघाचे अध्यक्ष माजी खा. मारोतराव कोवासे, राज्य संघाचे अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, उपाध्यक्ष हरिराम वरखडे, संचालक घनश्याम मडावी, जिल्हा संघाचे अध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, राज्य संघाचे सचिव कटरे, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, आलापल्लीचे उपवनसंरक्षक मीना, भामरागडचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरण, देसाईगंजचे उपवनसंरक्षक होशिंग, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक ठाकरे, चंद्रपुरचे वनाधिकारी झोडगे आदी उपस्थित होते. यावेळी माजी खा. मारोतराव कोवासे व हरिराम वरखडे व टेकाम यांनी जंगल कामगार सहकारी संस्थांसमोर सध्या असलेल्या अडचणी मिश्रा यांच्यासमोर मांडल्या. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वन विभागाने सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याची बाब लक्षात आणून दिली. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल कामगार संस्था हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. या संस्था बंद पडल्यास हजारो नागरिकांच्या रोजगारावर गदा येईल, त्यामुळे या संस्था जिवंत ठेवणे व सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचीही बाब इतर सदस्यांनी लक्षात आणून दिली.
संचालन वनवृत्त कार्यालयात लेखापाल मैंद, जिल्हा संघाचे सचिव एन. झेड जांभुळकर यांनी तर आभार विभागीय वनाधिकारी कोवे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)