शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीत उमेदवार, प्रतिनिधींच्या कोरोना चाचणीला प्रशासनाचा फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

गडचिराेली : काेराेनाच्या संकटातही ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणुकीच्या कालावधीत हाेणाऱ्या गर्दीमुळे काेराेनाची साथ वाढू नये, यासाठी निवडणुकीचे ...

गडचिराेली : काेराेनाच्या संकटातही ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणुकीच्या कालावधीत हाेणाऱ्या गर्दीमुळे काेराेनाची साथ वाढू नये, यासाठी निवडणुकीचे कर्तव्य बजावणारे कर्मचारी, उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी यांची काेराेना टेस्ट करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात या नियमाला फाटा दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत काेराेनाचे संकट वाढण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, देसाईगंज, कुरखेडा, काेरची या सहा तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात १५ जानेवारी राेजी मतदान घेतले जाणार आहे. काेरची, कुरखेडा या तालुक्यांमधील काही ग्रामपंचायती नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्यामुळे तेथील निवडणूक कर्मचारी पाेलिसांच्या ताफ्यासह १३ जानेवारी राेजीच ग्रामपंचायतीकडे प्रस्थान हाेणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची १२ जानेवारीपर्यंत काेराेना टेस्ट हाेणे आवश्यक हाेते. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांची काेराेना टेस्ट करण्यात आली नाही. उमेदवार तर काेराेना टेस्टपासून दूरच आहेत.

बाॅक्स...

मतदान केंद्रावर राहणार आराेग्य कर्मचारी

निवडणूक कर्मचाऱ्यांसाेबतच प्रत्येक मतदान केंद्रावर आराेग्य कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. यापूर्वी पदवीधर मतदार संधाची निवडणूक पार पडली. त्यावेळीही आराेग्य कर्मचाऱ्याची प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली हाेती. ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही आराेग्य कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. मतदान करतेवेळी रांग लागल्यास साेशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक हाेते. मात्र, मतदार व कर्मचारीही साेशल डिस्टन्सिंगचे काेणतेही पालन करीत नसल्याचे दिसून येत हाेते. पदवीधर मतदार संघाचे मतदार सुशिक्षित समजले जातात, तरीही गर्दी उसळली हाेती.

काेट...

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतानाच काेराेनाची साथ वाढणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करण्याचे निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहेत. मात्र, अगदी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापासून तर इतर सर्व प्रक्रिया करताना माेठ्या प्रमाणात गर्दी उसळत हाेती. मतदार, उमेदवार तर साेडाच कर्मचारीही साेशल डिस्टन्सिंग पाळत नव्हते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेल्या मतदारांची तपासणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, एकाही उमेदवाराची तपासणी करण्यात आली नाही. मतदान केंद्रावर तरी आवश्यक त्या उपाययाेजना राहणार काय, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

- सचिन मुरकुटवार, उमेदवार