गडचिरोली माओवादमुक्त ! जवानांचा 'अंतिम प्रहार', आठ जहाल माओवाद्यांना अटक, पाच जणांची शरणागती

By संजय तिपाले | Updated: May 16, 2026 19:24 IST2026-05-16T19:23:27+5:302026-05-16T19:24:44+5:30

Gadchiroli : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवादमुक्तीसाठी दिलेल्या ३१ मार्च २०२६ च्या डेडलाईनपर्यंत जवानांनी निर्णायक कामगिरी बजावली होती. उर्वरित मोहीम फत्ते करण्यात १६ मे रोजी यश आले.

Gadchiroli Maoist-free! 'Final strike' by soldiers, eight Maoists arrested, five surrender | गडचिरोली माओवादमुक्त ! जवानांचा 'अंतिम प्रहार', आठ जहाल माओवाद्यांना अटक, पाच जणांची शरणागती

Gadchiroli Maoist-free! 'Final strike' by soldiers, eight Maoists arrested, five surrender

गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवादमुक्तीसाठी दिलेल्या ३१ मार्च २०२६ च्या डेडलाईनपर्यंत जवानांनी निर्णायक कामगिरी बजावली होती. उर्वरित मोहीम फत्ते करण्यात १६ मे रोजी यश आले. 'ऑपरेशन अंतिम प्रहार' मोहिमेंतर्गत आठ जहाल माओवाद्यांना जेरबंद करण्यात आले तर छत्तीसगडच्या पाच माओवाद्यांनी शरणागती पत्कारली. यात गडचिरोलीतील शेवटच्या दोन माओवाद्यांचा समावेश असून यामुळे जिल्हा माओवादमुक्तीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

पोलिस अधीक्षक एम. रमेश , सीआरपीएफचे उप महानिरीक्षक अजयकुमार शर्मा, अपर अधीक्षक गोकुल राज जी, कार्तिक मधिरा, सहायक अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. जिल्हा पोलिस दल व सीआरपीएफने २ ते १५ मे दरम्यान 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अभियान राबविले. यादरम्यान माओवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेल्या

चार एके- ४७ , दोन एलएमजी रायफल, चार एसएलआर रायफल, तीन इन्सास रायफलसह एकूण ५१ अग्निशस्त्रे जप्त केली. सोबतच तब्बल ६४ लाख ३४ हजार रुपयांची रोकडही हस्तगत केली. ताब्यात घेतलेल्या आठ माओवाद्यांवर ६४ लाखांचे बक्षीस होते. 

यांना केली अटक

अटकेतील एकमेव जयराम मोंगे गावडे हा गडचिरोलीतील रहिवासी आहे. माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० मध्ये पीपीसीएमपदावर असलेला जयराम गिलनगुडा (ता. एटापल्ली) गावचा रहिवासी  आहे. उर्वरित छत्तीसगडचे आहेत. मुकेश उर्फ लच्छु अवलाम, विजय उर्फ मंगडू तामो, रजिता उर्फ शामबत्ती मडावी यांना भामरागडच्या फोदेवाडा जंगल परिसरातून अटक केली. राजू उर्फ मंगडू वेको, त्याची पत्नी जनी उर्फ नगी येमला यांना गुंडेनूर जंगलातून ताब्यात घेतले तर एटापल्लीच्या गर्देवाडाजवळील नैताळा जंगलातून ज्योती उर्फ अकिला पोटावी, आमती उर्फ आयती पोडियाम यांच्या मुसक्या आवळल्या.

बुर्गीच्या 'मधु'सह पाच जणांचे आत्मसमर्पण

एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील रहिवासी व कुतुल एरिया कुरिअर टीमचा विभागीय समिती सदस्या मधु उर्फ राकेश वेळदा याच्यासह पाच माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जीवन उर्फ जग्गु मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली रघु कुरसाम, लक्ष्मी डेंगा पुनेम या छत्तीसगडच्या माओवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शासनाचे ३८ लाखांचे इनाम होते. संविधान हाती देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामील करण्यात आले.   
 

Web Title : गढ़चिरौली माओवाद मुक्त: 'अंतिम प्रहार' में गिरफ्तारियां, आत्मसमर्पण, हथियार जब्त

Web Summary : 'ऑपरेशन अंतिम प्रहार' के बाद गढ़चिरौली को माओवाद मुक्त घोषित किया गया। आठ माओवादियों को गिरफ्तार किया गया, और एक प्रमुख नेता सहित पांच ने आत्मसमर्पण कर दिया। बड़ी मात्रा में हथियार और नकदी जब्त, सुरक्षा बलों के लिए एक महत्वपूर्ण जीत।

Web Title : Gadchiroli Maoist-Free: 'Final Assault' Nets Arrests, Surrenders, Weapons Seized

Web Summary : Gadchiroli declared Maoist-free after 'Operation Final Assault.' Eight Maoists were arrested, and five, including a key leader, surrendered. A large cache of weapons and cash were seized, marking a significant victory for security forces.