शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली फळ लागवडीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी वैरागड येथील शेतकरी नेताजी बोडणे यांच्या हिरापूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी वैरागड येथील शेतकरी नेताजी बोडणे यांच्या हिरापूर रिठ येथील शेतशिवारातील फळ लागवडीची ३१ जानेवारी रोजी पाहणी केली. याशिवाय आरमोरी तालुक्यातील शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.

तालुक्यातील वैरागड, हिरापूर रिठ, शिवणी खुर्द, मानापूर व इतर अनेक गावांना भेटी देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी फळलागवड, भाजीपाला, तेलवर्गीय पिके, कडधान्य, रब्बी धानपीक, मका यासारख्या पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना पीक लागवड, मशागत, कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली. याशिवाय शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची शेताच्या बांधावर माहिती दिली.

वैरागड येथील शेतकरी नेताजी बोडणे यांनी त्यांच्या हिरापूर रिठ येथील शेतात सलग २० आर. जागेवर दशेरी आणि लंगडा या आंब्यांच्या झाडांची लागवड केली. या शेतकऱ्याने ८० झाडांची लागवड करून झाडांची जोपासना करुन इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. याची दखल घेऊन बऱ्हाटे यांनी नेताजी बोडणे या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन हितगुज साधत फळ लागवडीविषयी जाणून घेतले. याबाबत चौकशी करत इतरही कृषिविषयक बाबींवर माहिती दिली. यावेळी आरमोरी तालुका कृषी अधिकारी टी.डी.ढगे, मंडळ कृषी अधिकारी जी.एन. जाधवर, कृषी सहाय्यक कोविद मडकाम, शेतकरी नेताजी बोडणे, नामदेव बोडणे, नरेंद्र बावनकर उपस्थित होते. याशिवाय आनंदराव बावनकर यांनी शेतात मका पिकाची लागवड केली. त्याची सुद्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी पाहणी केली.

तालुक्यातील शिवणी खुर्द येथील शेतकरी सोनू साखरे यांनी शेतामध्ये करडई या तेलवर्गीय पिकाची लागवड केली. या पिकाचीसुद्धा त्यांनी पाहणी केली. आरमोरी तालुक्यात कडधान्यांचेसुद्धा माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याची दखल घेऊन त्यांनी मानापूर येथील देवेंद्र मोरघडे यांच्या शेतावर जाऊन हरभरा पिकाची पाहणी केली. शिवाय शेतकऱ्यांसाेबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. मोह फुलांविषयी माहिती दिली. मोहफुलापासून मिळणारे वार्षिक उत्पन्नावर चर्चा करून मोहफुलापासून तयार केलेले लाडू, रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्यामध्ये असलेल्या विविध घटकांची माहिती दिली.