शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 16:57 IST

Varsha Gaikwad : शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी.

सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू कराव्या अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती. शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिलं. School in maharashtra will be starting from 4th october education minister varsha gaikwad clarifies

ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे. शाळांबाबतचे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार असून निवासी शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना माहिती अवगत करून देणं आणि त्यांच्याशी कसं वागावं हे शिक्षकांना सांगाणं. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. याशिवाय घरात शिरताना मुलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, गणवेश धुणे, आंघोळ करणे अशा बाबींचाही नियमावलीत समावेश करण्यात आल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

बच्चू कडूंकडूनही प्रतिक्रिया
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षणSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे