दुसरी-तिसरी-चौथी झाली, आता सहावी इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम आराखडा मंजूर; कधीपासून होणार लागू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 23:34 IST2026-05-05T23:34:47+5:302026-05-05T23:34:47+5:30

Maharashtra 6th Std Portion Change Updates News: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

minister dada bhuse told now the new curriculum plan for sixth std has been approved know when will it be implemented | दुसरी-तिसरी-चौथी झाली, आता सहावी इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम आराखडा मंजूर; कधीपासून होणार लागू?

दुसरी-तिसरी-चौथी झाली, आता सहावी इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम आराखडा मंजूर; कधीपासून होणार लागू?

Maharashtra 6th Std Portion Change Updates News: इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. 

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी आणि चौथीसोबतच सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. 

राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काठिण्यपातळी निश्चित करुन अध्ययन निष्पत्तिवर आधारित अभ्यासक्रम आराखडा ठरविण्यात आला आहे. यास राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानंतर या प्रारूपाला शालेय शिक्षण आयुक्तांकडे असलेल्या अभ्यासक्रम समन्वय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यासाठीची पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तातडीने तयार करून ती येत्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध करुन दिली जातील.

दरम्यान, दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रम आराखडे आणि त्यासाठीच्या पाठ्यपुस्तकांवरील शिकवणी आदींसाठी एससीईआरटीतर्फे राज्यातील मुख्य प्रशिक्षण याच महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. त्यांनतर जिल्हास्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण केले जाणार असल्याची माहिती डॉ. वसेकर यांनी यावेळी दिली.

 

Web Title : महाराष्ट्र में छठी कक्षा का नया पाठ्यक्रम स्वीकृत; जून से लागू

Web Summary : महाराष्ट्र के शिक्षा विभाग ने दूसरी से चौथी कक्षा के बाद छठी कक्षा के लिए संशोधित पाठ्यक्रम को मंजूरी दी। कार्यान्वयन जून में शुरू होगा। अंतिम स्वीकृति के बाद शैक्षणिक वर्ष की शुरुआत से पहले नई पाठ्यपुस्तकें उपलब्ध होंगी। शिक्षक प्रशिक्षण आयोजित किया जा रहा है।

Web Title : Maharashtra Approves New Sixth Grade Curriculum; Implementation Starts June

Web Summary : Maharashtra's Education Department approved a revised curriculum for sixth grade, following approvals for grades two through four. Implementation begins in June, alongside the other grades. New textbooks will be available before the start of the academic year after final approval. Teacher training is being organized.