शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

प्रलोभने दाखवून लोकांना घातला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 17:41 IST

११ जणांविरुध्द पिंपळनेरला गुन्हा

धुळे : ठेवीदारांना आकर्षक बक्षिसांसह दामदुपटीचे आश्वासन देवून ठेवी स्विकारणाऱ्या एका कंपनीने साक्री तालुक्यात लाखोंचा गंडा घातला. एका महिलेने हिम्मत करुन इतरांच्यावतीने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे.एलआयसीआयएल एलडीएल रियल लाईफ क्रियेटर इंडिया लि. आणि रियल लाईफ ?ग्रो कॅटल प्रा. लि. या कंपनीच्या नावाने साक्री तालुक्यातील अनेकांकडून ठेवी स्विकारण्यात आल्या. या ठेवींवर आकर्षक बक्षिसांसह त्या दामदुप्पट करुन देण्याचा वायदा कंपनीच्यावतीने संचालकांसह प्रतिनिधींनी केलेला होता. परिणामी साक्री तालुक्यातील ग्रामस्थांनी जवळपास १ लाख ९० हजाराची रक्कम यात गुंतवली होती.सन २०१२ पासून स्विकारण्यात आलेली मुळ रक्कम अथवा त्यावरील आकर्षक बक्षिस किंवा दामदुपटीचे पैसे न मिळाल्याने तक्रार होऊ लागली. मात्र ज्यांनी हे पैसे स्विकारले तेच उपलब्ध होत नसल्याने पैसे भरणाऱ्यांनी फसवणूक झाल्याची ओरड सुरु केली. असाच पैसा गुंतविणाऱ्या सामोडे येथील संगिता शगेंद्र याईस या ३९ वर्षीय महिलेने हिंमत करुन पोलिसात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चंद्रसिंग शिवाजी उर्फ शिवाजीभाई चव्हाण रा. सुरत, संतोष किसन सपाकाळी रा. सुरत, प्रदीप चिंतामण पानपाटील रा. सुरत, हिरालाल शंकर भालेराव रा.सुरत, प्रतिभा देविदास अहिरे रा. धुळे, भैय्या दिलीप अहिरे रा.पाडदळे ता. धुळे, चंद्रकला संजय खैरनार रा. धुळे, संगिता दिपक अहिरराव रा. धुळे, आशा काशिनाथ वसईकर रा. धुळे, भैय्यासाहेब यशवंत गुजेला रा. धुळे, ज्ञानेश्वर शिवदास पाटील रा.बल्हाणे ता.साक्री अशा ११ संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अलेला आहे.फसवणुकीची रक्कम लाखोंच्या घरात असल्याने गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याने सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे