शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाऊन लग्न, दीड वर्षाच्या संसारानंतर पोलिसांची 'एंट्री'; चिमुकलीसमोरच पित्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:40 IST

तीन कुटुंबातील नातेवाइकांच्या संपर्क क्रमांकाच्या तांत्रिक तपासातून अंकुश धाराशिव जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.

छत्रपती संभाजीनगर : वाळुजमध्ये कामा दरम्यान २२ वर्षीय मुलाची १६ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून दोघेही पळून गेले. यात मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. त्यांना मुलगी देखील झाली. तीच्यासह ते धाराशिवमध्ये एका मोठ्या शेतकऱ्याकडे कामालाही लागले. मात्र, दीड वर्षानंतर पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि मुलावर थेट कारागृहात जाण्याची वेळ आली.

२४ वर्षीय अंकुश २०२४ मध्ये वाळुज औद्योगिक वसाहतीत काम करत होता. तेथेच त्याची एका कामगाराच्या मुलीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. संसाराच्या आणाभाका घेत दोघांनी पळून जात लग्नही केले. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील अंकुशवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा नाशिकसह सर्वत्र शोध घेतला. मात्र, मोबाइल क्रमांक बदलून कुटुंबाच्याही संपर्कात नसल्याने ते पोलिसांना मिळून येत नव्हते. आपली मुलगी कुठे असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, या काळजीमुळे आई-वडीलही व्याकुळ झाले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपास वर्ग केला.

विभागाच्या प्रमुख सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचोळकर, पूनम परदेशी यांनी दोघांचा शोध सुरू केला. त्यांच्या जवळपास तीन कुटुंबातील नातेवाइकांच्या संपर्क क्रमांकाच्या तांत्रिक तपासातून अंकुश धाराशिव जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.

शेतातच खोली, घरात पाच महिन्यांची चिमुकलीआपल्यावर गुन्हा दाखल झालाय, याची अंकुशला कल्पना नव्हती. केवळ कुटुंबाच्या भीतीने ते लपून होते. एका शेतकऱ्याचे शेत सांभाळून ते दोघे आनंदाने राहत होते. अंकुशच्या पत्नीने नुकतेच वयाचे १८ वर्षेे देखील पूर्ण केली आहेत. त्यांना पाच महिन्यांची मुलगी आहे. मात्र, तांत्रिक तपास करत पोलिस त्यांच्या शेतातील घरापर्यंत पोहोचताच दोघांना धक्का बसला. पत्नी अल्पवयीन असताना पळवून नेत लग्न केल्याने पोलिसांना त्याला अटक करावी लागली. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र, तरीही अंकुशच्या जामिनासाठी न्यायालयातून लढून त्याच्यासोबतच संसार करेल, असे मुलीने बोलून दाखवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Eloped marriage: Police arrest father after 1.5 years, child present.

Web Summary : A 22-year-old eloped with a 16-year-old, leading to abduction charges. After 1.5 years of marriage and a child, police arrested him in Dharashiv. The girl has turned 18 and vows to fight for his bail.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण