उस्मानाबाद : येथील विवेकानंद युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव सप्ताहाचे आयोजन केले आहे. याची सुरुवात रविवारी शिवव्याख्यान व वक्तृत्व स्पर्धेने झाली.
या ऑनलाईन कार्यक्रमात जवळपास ५५ युवा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. यामधील २० जणांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. यानिमित्ताने १५ फेब्रुवारी रोजी वृक्षारोपण, १६ रोजी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम, १७ रोजी विविध आजारांबाबत जनजागृती अभियान, १८ फेब्रुवारीला अन्नदान व हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी दर्गाह येथे चादर कार्यक्रम होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व नेहरू युवा केंद्राच्या ‘कॅच द रेन’ कार्यक्रमाविषयी जनजागृती तर २० फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांसाठी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, सहसचिव महेंद्रप्रताप जाधव, राज्य समन्वयक स्वप्निल देशमुख, क्रांतिसिंह काकडे, शुभम मगर, समर्थ शिरसीकर, नेहरू युवा केंद्राचे रोहन गाढवे आदींनी पुढाकार घेतला.
—————-