शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम प्रकल्पात १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 21:05 IST

या प्रकरणी विकासकासह सर्वसंबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मजुर संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देजेपी नॉर्थ इन्फ्रा या बांधकाम प्रकल्पात काम करत असताना १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी ८ महिन्यांची गर्भवती आहे.

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत वेस्टर्न हॉटेलमागे सुरु असलेल्या जेपी नॉर्थ इन्फ्रा या बांधकाम प्रकल्पात काम करत असताना १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी ८ महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी विकासकासह सर्वसंबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मजुर संघटनेने केली आहे.हाटकेशवरुन वेस्टर्न हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर जेपी नॉर्थ इन्फ्रा या विकासकाचे मोठे बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. सदर प्रकल्पात मजुर काम करणारा रबीउल मंडल (२३) हा तरुण काम करत असताना १६ व्या मजल्यावरुन खाली पडण्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. १६ व्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पालिकेच्या जोशी रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात त्याचा मृतदेह ठेऊन आज शवविच्छेदन करण्यात आले. पोलीसांनी सुरवातीला अपघाती मृत्युची नोंद केल्या नंतर तपास सुरु केला. दरम्यान या घटनेने बांधकाम प्रकल्पा ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा बेल्ट आदीची खबरदारी घेतली न गेल्याने मंडलचा बळी गेल्याचे मजुर संघटनेचे अ‍ॅड. किशोर सामंत यांनी सांगीतले. विकासका सह सर्व संबंधित यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी आणि मजुराच्या नातलगांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सामंत यांनी केली. १४ जुलै रोजी याच परिसरात सुरु असलेल्या रवी बिल्डरच्या बांधकाम प्रकल्प ठिकाणी ११ व्या मजल्यावरुन पडून मोहम्मद झुल्फीकार रहमान मलिक (२५) या मजुराचा बळी गेला होता. पोलीसांनी त्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परंतु सततच्या घडणाऱ्या या घटनांमुळे मजुरांच्या जीविताला धोका वाढला असून विकासकांसह बांधकाम ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी मजुरांनी केली आहे. मंडल यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीसांनी कार्यवाही सुरु केली असून विकासकासह संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूmira roadमीरा रोडPoliceपोलिस