शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'तू आवडली' म्हणत मंगळसूत्र घालायला गेला, तरुणीनं चांगलाच चोपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:35 IST

माथेफिरू पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर त्याला तरूणीसह काही नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले...

जळगाव- गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर परिसरात एका माथेफिरूने, एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात घुसून, तेथे काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीच्या गळ्यात बळजबरीने मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही, तर या माथेफिरूला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने कार्यालयातील वस्तूंचीही तोडफोड केली. दरम्यान, तरूणीसह नागरिकांनीही त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले.

गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात काही तरुण-तरुणी काम करतात. अभय सोनवणे हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीच्या मागे फिरत आहे. तरुणीने त्यास वारंवार समजावल्यानंतरही तरुण ऐकत नसल्याने तरुणीने याबाबत पोलिसातदेखील कळविले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास माथेफिरू तरुण थेट कार्यालयात घुसला आणि काव्या (नाव बदललेले) आहे का? अशी विचारणा करीत दुसऱ्याच एका तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधू लागला. तरुणीने आरडाओरड करताच इतरांनी त्यास बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला विरोध होत असल्याचे पाहून माथेफिरू तरुणाने कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करीत काढता पाया घेतला.

पोलिसांनी घेतले ताब्यात -कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत शहर पोलिसांना कळविले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माथेफिरू तरुणाचा परिसरात शोध घेतला असता तो सापडला. त्या तरुणाला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, माथेफिरू पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर त्याला तरूणीसह काही नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्याने पोलिसांना अभय सोनवणे असे नाव सांगितले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिस