The teacher escaped with the eight standard student in Gujarat | सैराट झालं जी! आठवीतल्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकाच फरार
सैराट झालं जी! आठवीतल्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकाच फरार

ठळक मुद्दे शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहे. भा. दं. वि. कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

गांधीनगर - गुजरातमधील अहमदाबादमधील गांधीनगर येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानाचे माहेरघर असलेल्या शाळेत हा प्रकार घडला आहे. चक्क २६ वर्षीय वर्गशिक्षका आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत पळून गेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ माजली आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहे.

शाळेतील वर्गशिक्षिका विद्यार्थ्यासोबत पळून गेली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलाचे वडिल सरकारी नोकरी करत असून त्यांनी शिक्षिकेवर फूस लावून मुलाला पाठविल्याची म्हणजेच अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. शिक्षिका आणि विद्यार्थ्यामध्ये वर्षभरापासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. शिक्षेकेला विद्यार्थी खूप आवडू लागला. ते नंतर प्रेमसंबंधात बदलले. या गोष्टी शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना समज दिली होती. मुलगा आठव्या इयत्तेत शिकत आहे. शुक्रवारी दोघे घर सोडून निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली. भा. दं. वि. कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अद्याप शिक्षिका आणि अल्पवयीन मुलाचा ठावठिकाणा लागलेला नाही. 

Web Title: The teacher escaped with the eight standard student in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.