महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 10:20 AM2021-04-09T10:20:39+5:302021-04-09T10:20:57+5:30

Maharashtrian couple Suspicious death in the US : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रामधील एका जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. (Crime News) सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुखरूप आहे.

Suspicious death of a couple from Maharashtra in the US, fortunately the girl survived | महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली 

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली 

googlenewsNext

मुंबई - अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रामधील एका जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. (Crime News) सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुखरूप आहे. मुळचे महाराष्ट्रातीलबीडमधील अंबाजोगाई येथील असलेले हे दाम्पत्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेत वास्तव्यास होते. दरम्यान, या दाम्पत्याने आत्महत्या केली की, त्यांची हत्या झाली, याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. (Suspicious death of a couple from Maharashtra in the US, fortunately the girl survived)

बालाजी भारत रुद्रवार आणि आरती बालाजी रुद्रवार अशी संशयास्पद मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. बालाजी हे अंबाजोगाईमधील व्यापारी भारत रुद्रावार यांचे चिरंजीव होते. सहा वर्षांपूर्वी ते अमेरिकेमधील न्यू जर्सी राज्यात स्थायिक झाले होते. 

बुधवारी बालाजी आणि आरती यांची कन्या घराच्या गॅलरीत बराच वेळ रडत असल्याने संश आल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. दरम्यान, ही आत्महत्या की हत्या याचा तपासा पोलिसांकडून सुरू आहे. 

दरम्यान, अमेरिकेतील पोलिसांनी रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूची माहिती भारतातील त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. ही बातमी ऐकताच रुद्रवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. 

Read in English

Web Title: Suspicious death of a couple from Maharashtra in the US, fortunately the girl survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.