पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 09:14 PM2020-07-06T21:14:23+5:302020-07-06T21:16:13+5:30

NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे.

The suspended police officer, who was giving sensitive information to Pakistani authorities, revealed in an NIA investigation | पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

googlenewsNext
ठळक मुद्देनिलंबित डीएसपी दविंदर सिंग याच्याविरोधात दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला होता.दविंदर सिंगला यावर्षी ११ जानेवारी रोजी पोलिसांच्या पथकाने कुलगाममधील मीर बाजार येथून दहशतवाद्यांसह अटक केली होती.

जम्मू-काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये पकडलेल्या डीएसपी दविंदर सिंगला जामीन मिळाला असून NIA ने सोमवारी याप्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. दिल्लीच्या कोर्टाने दविंदर सिंग यांना जामीन मंजूर केला होता. निलंबित डीएसपी दविंदर सिंग याच्याविरोधात दिल्ली पोलिस आरोपपत्र दाखल करू शकले नाही, असे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र, NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे. त्याने संवेदनशील माहिती दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

जानेवारीत दविंदर सिंगला पकडण्यात आले
दविंदर सिंगला यावर्षी ११ जानेवारी रोजी पोलिसांच्या पथकाने कुलगाममधील मीर बाजार येथून दहशतवाद्यांसह अटक केली होती. या दिवशी तो कर्तव्यावर हजर नव्हता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिंग यांनी १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत सुट्टी घेण्यासाठी अर्ज केला होता. सिंग यांनी एसपी म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत ते एसपी होणार होता.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगलाही शौर्यासाठी पदक देण्यात आले होते. जम्मू-काश्मीर प्रशासनाने ते परत घेण्याचे आदेशही जारी केले होते. दहशतवाद्यांसमवेत डीएसएपी दर्जाच्या अधिकाऱ्याला  पकडणे हे एक मोठे यश मानले जात होते. त्यानंतर दविंदर सिंगलाही दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, ते दहशतवाद्यांसमवेत पकडलेल्या डीएसपी देविंदर सिंगबरोबर दहशतवाद्यांसारखेच वागणूक देत आहेत. त्यावेळी जम्मू काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “शोपियाचे एसपी यांना एक सूचना मिळाली होती की, दोन दहशतवादी आय -10 कारमधून निघाले आहेत आणि राष्ट्रीय महामार्गावर जम्मूला जात आहेत. एसपीने मला सांगितले आणि मी दक्षिण काश्मीरचे डीआयजी यांना त्यांच्या भागात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले. नाकाबंदीदरम्यान दोन वॉन्टेड असलेले दहशतवादी कारमधून सापडले होते आणि त्यांच्याबरोबर आमच्या फोर्सचा एक डीएसपीही सापडला. तेथे स्थानिक अ‍ॅडव्होकेटही होते. "

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

 

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई

Web Title: The suspended police officer, who was giving sensitive information to Pakistani authorities, revealed in an NIA investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.