कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 10:51 PM2020-07-04T22:51:06+5:302020-07-04T22:53:05+5:30

दिल्लीतील पापतरगंज जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुणीचे नाव अंशिका असं आहे.  उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात ही घटना घडली.

A 19-year-old girl who was thrown from a bus as a possible corona has died, relatives allege | कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

Next
ठळक मुद्दे ही युवती नोएडाहून तिचं गाव असलेल्या फिरोजाबाद जिल्ह्यातील सिकोहबादला निघाली होती.१९ वर्षांच्या अंशिका या तरुणीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. तिच्या शरीरावर मारहाणीच्या  कुठल्याही खुणा नव्हत्या, असं पोलिसांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - कोरोनाची संभाव्य रुग्ण समजून बसमधून एका १९ वर्षाच्या मुलीला बसमधून फेकून देण्यात आलं. या तरुणीचा मृत्यू झाला आहे. बसमधून फेकल्यामुळे मृत्यू झाल्याचा तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. दिल्लीतील पापतरगंज जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुणीचे नाव अंशिका असं आहे.  उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात ही घटना घडली.

ही युवती नोएडाहून तिचं गाव असलेल्या फिरोजाबाद जिल्ह्यातील सिकोहबादला निघाली होती. आई आणि बहीण बसमध्ये चढल्या तेव्हा तिची प्रकृती ठणठणीत होती, असा दावा या तरुणीच्या भावाने केला आहे. बसमधून फेकल्यामुळेच मृत्यू झाल्याचा त्याचा आरोप आहे. बसमधून प्रवास करणारी तरुणी आजारी दिसल्यावर तिला बसमधल्या कंडक्टर, चालक कर्मचाऱ्यांनी टोल प्लाझाजवळ खाली उतरायला सांगितलं. तिला कोरोनाची लागण झाल्याचा त्यांना संशय होता. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ वर्षांच्या अंशिका या तरुणीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. तिच्या शरीरावर मारहाणीच्या  कुठल्याही खुणा नव्हत्या, असं पोलिसांनी स्पष्ट केले. हा नैसर्गिक मृत्यू असल्याने गुन्हा नोंदवला नसल्याचं पोलिसांचं मत आहे. शवविच्छेदन अहवालानुसार नैसर्गिक मृत्यू आहे , असं पोलिसांचं म्हणणं आहे.

मात्र,अंशिकाच्या भावाचा आरोप आहे की, 'आपली बहीण बसमध्ये बसण्यापूर्वी बरी होती. उन्हाच्या उकाड्यामुळे तब्येत घराब झाल्याने तिची शुद्ध हरपली होती. बसमधून तिला जबरदस्तीने उतरवण्यात आलं. मथुरा टोल प्लाझाजवळ तिला खाली फेकण्यात आलं. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.' मृत तरुणीचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून नोएड येथे नोकरी करतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी आपल्या गावी जायचा निर्णय घेतला. १५ जून रोजी अंशिका आणि सर्वेश देवी दुपारी अडीचच्या सुमारास नोएडाच्या सेक्टर ३७ येथून यूपी रोडवेज बसमध्ये चढल्या. दुपारी ४.२० च्या सुमारास, दहा वर्षाचा भाऊ शिवला फोन आला की आपल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

Web Title: A 19-year-old girl who was thrown from a bus as a possible corona has died, relatives allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.