Called home saying it was a friend's son's birthday; four people raped women in Mankhurd | कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

मुंबई : मानखुर्द येथे एका ४४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. 


२४ जून रोजी आरोपी अब्दुल शेख याने त्याचा मित्र मुराद शेख याच्या मुलाचा वाढदिवस असल्याचे खोटे सांगून पीडित महिलेस रहीम शेख याच्या घरी बोलावले. यावेळी आरोपींनी पीडित महिलेस कोल्ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध दिले. महिला अर्धवट शुद्धीत असल्याचा फायदा घेत आरोपींनी अतिप्रसंग करत महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. यानंतर अब्दुल शेख याने महिलेस टॅक्सीतून घरी सोडले. दुसर्‍यादिवशी पीडित महिलेस त्रास होऊ लागल्याने त्यांनी शरीराची तपासणी केली. यावेळी त्यांना अंगावर ओरखडल्याच्या जखमा तसेच चिमटे काढले असल्याचे आढळून आले.


 यानंतर महिलेस आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे समजले. पीडित महिला लाजेपोटी दोन दिवस घरीच थांबली. २७ जून रोजी जास्त त्रास होऊ लागल्याने पीडित महिला उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी रहीम शेख, अब्दुल शेख, मुराद शेख आणि हैदर शेख यांना अटक केली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! एसटी महामंडळात कोरोनाने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

Web Title: Called home saying it was a friend's son's birthday; four people raped women in Mankhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.