Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:58 PM2020-07-06T12:58:58+5:302020-07-06T13:01:19+5:30

Sushant Singh Rajput Suicide : आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.

Breaking - Sushant Singh Rajput Suicide: Film director Sanjay Leela Bhansali reached to Bandra police station | Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे.सुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे

मुंबई - सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलीस अतिशय बारकाईने तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी बर्‍याच जणांची चौकशी केली जात आहे. आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. भन्साळी यांना पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.

सुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार याप्रकरणी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे पोलीस चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

रामलीला चित्रपटातून सुशांतला काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यावर कोणी दबाव टाकला होता का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट सुशांतला मिळणार होते. मात्र, त्याआधी सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत करार झाल्याने त्याला त्या चित्रपटात काम करता आले नाही. परिणामी त्याच्यातील नात्यात कटुता आली होती. त्यामुळे यातील तथ्य जाणुन घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत. त्यानुसार अद्याप ३० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून याप्रकरणी अनेकांना समन्स पाठविण्यात आले आहेत. ज्यात भन्साळी यांचाही समावेश असल्याचे समजते. मात्र, याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे किंवा वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

 

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

Web Title: Breaking - Sushant Singh Rajput Suicide: Film director Sanjay Leela Bhansali reached to Bandra police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.