राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 08:24 IST2025-06-10T08:22:44+5:302025-06-10T08:24:35+5:30

Raj Kushwaha viral video, Sonam Raghuvanshi Case: राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह याचाही समावेश

sonam raghuwanshi boyfriend raj kushwaha present raja raghuvanshi funeral video viral | राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार

राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार

Sonam Raghuvanshi Case: सध्या देशभरात चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात ( Raja Raghuvanshi Murder ) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या साथीने राजा रघुवंशीची हत्या घडवून आणली हे समोर आले होते. तशातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजा रघुवंशी हत्याकांडातील हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये राजाच्या हत्येतील संशयित आणि सोनमचा प्रियकर राज कुशवाह हाच राजाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसत आहे. राज कुशवाह ( Raj Kushwaha हा त्याची प्रेयसी सोनमचे वडील देवी सिंह यांना कठीण प्रसंगात आधार देताना दिसत आहे.

सोनमच्या वडिलांना आधार देताना दिसला राज कुशवाह

मिळालेल्या माहितीनुसार, राज कुशवाह हा तोच तरुण आहे जो सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात काम करायचा. तो सुमारे दीड वर्ष सोनमच्या घराजवळच राहत होता. राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे, ज्यात राज कुशवाहचाही समावेश आहे. राज कुशवाहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीचा असल्याचे म्हटले जाते. यामध्ये तो देवी सिंह यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार देताना दिसतोय.

सुरुवातीला अपहरणाचे वाटणारे प्रकरण हत्याकांडानंतर गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात त्याची पत्नी सोनम रघुवंशीही सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पण सोनम मात्र स्वतःला निर्दोष सांगत असून, स्वत:च्याच अपहरणाची कहाणी सांगत आहे. अशा परिस्थितीत, राज कुशवाहाशी तिचे संबंध तपासाचा विषय आहे. सोनमच्या वडिलांनीही मान्य केले आहे की राज कुशवाह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आला होता. तो सर्वांशी एकदम नेहमीप्रमाणे बोलत होता, परंतु तिच्या वडिलांना कल्पना नव्हती की तो या हत्येच्या कटाचा भाग असू शकतो.

Web Title: sonam raghuwanshi boyfriend raj kushwaha present raja raghuvanshi funeral video viral