Shocking! Wife murdered husband by tired, kept the body hidden in bed for two days | धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

ठळक मुद्देमंगळवारी सखान ताल गावात पोलिसांना हत्येची माहिती मिळाली होती. जेव्हा ते घटनास्थळी पोचले, तेव्हा कळले की  निर्मलसिंग नावाचा एक व्यक्ती आहे जो त्याच्या ढनीमध्ये राहतो, त्याची हत्या करण्यात आली आहे.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सादुलपूर तहसीलमधील हमीरवास पोलिस स्टेशन परिसरातील साखण ताल गावात एका पत्नीने तिच्या पतीचा गळा आवळून हत्या केली. त्याचवेळी घटनेनंतर पत्नीने मृतदेह दोन दिवस बेडमध्ये लपवून ठेवला.

हमीरवास पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हमीरवास पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिस अधिकारी सुभाष चंद्र यांनी सांगितले की, मंगळवारी सखान ताल गावात पोलिसांना हत्येची माहिती मिळाली होती. जेव्हा ते घटनास्थळी पोचले, तेव्हा कळले की  निर्मलसिंग नावाचा एक व्यक्ती आहे जो त्याच्या ढनीमध्ये राहतो, त्याची हत्या करण्यात आली आहे.

पोलीस म्हणाले की, निर्मल सिंगची पत्नी नीरज यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच निर्मल सिंगच्या पत्नीने निर्मल सिंगच्या गळ्याला दोरी घालून गळा दाबून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी निर्मल सिंगच्या पत्नी नीरजने पत्नीची हत्या केली आणि मृतदेह लपविण्यासाठी मृतदेह पलंगाच्या आत ठेवला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, या दोघांमध्ये अनेकदा वाद होतं आणि त्याबाबत बर्‍याचदा घटना समोर आल्या आहेत. त्याचवेळी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

10 दिवसांपूर्वी नीरज आपल्या पतीसोबत भांडून माहेरी आली होती. निर्मल घरात सर्वात लहान भाऊ होता. त्याचं 2011 मध्ये नीरज नावाच्या मुलीसोबत विवाह झाला होता. तीन भाऊ वेगवेगळे राहात होते. निर्मल आणि नीरज शेतात असलेल्या घरात राहात होते. निर्मल खूप दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करायचा. त्याला त्रासाला कंटाळून नीरजने पतीची हत्या केली.  
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

Web Title: Shocking! Wife murdered husband by tired, kept the body hidden in bed for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.