Pornographic videos are made by blackmailing young girls, forcing them to have sexual relations | अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

ठळक मुद्देअसे करणारे भामटे स्वत: ला कधी पोलिस म्हण फिरतात तर कधी भ्रष्टाचारविरोधी पथकाचे सदस्य, अँटी-रोमियो टीम आणि पत्रकार असल्याचा बनाव करतात.


कानपूर ग्रामीण भागातील रसूलबाद भागात काही नराधम सक्रिय आहेत, जे निर्जन ठिकाणी प्रेमी जोडप्यांचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करतात. काही जण वेश्या व्यवसायात स्त्रियांना उतरविण्याचा प्रयत्न करतात.

अशा टोळ्यांवर कारवाईसाठी आयपीएस अमिताभ ठाकूर यांनी एसपीला पत्र पाठवले आहे. तसेच पुरावे म्हणून 19 व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत. एसपीने त्याकडे गांभीर्याने पाहिले आहे. अशा लोकांना ठेचण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आयपीएस अमिताभ ठाकूर यांच्या पत्रानुसार रसूलबाद भागातील निर्जन ठिकाणी सापडलेल्या प्रेमी जोडप्यांचा अश्लील व्हिडिओ बनवून ते ब्लॅकमेल करतात. सांगितले की बर्‍याच टोळ्या संघटित आहेत आणि या प्रकारची कामे करीत आहेत.

टोळी प्रियकराला भेटायला येणाऱ्या मुलींना आपलं निशाणा बनवत आहेत. अशा लोकांवर ते आधीपासूनच लक्ष ठेवत. निर्जन जागा, रिक्त घरे आणि लुटलेल्या वीटभट्ट्या येथे जाणाऱ्या प्रेमीयुगुलांना आपलं लक्ष्य ही बनवत असे. या टोळीतील सदस्यांनी विद्यार्थिनी आणि  युवतींशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवलेहोते. तसेच प्रेमी जोडप्यांकडून पैसे कमवतात. असे करणारे भामटे स्वत: ला कधी पोलिस म्हण फिरतात तर कधी भ्रष्टाचारविरोधी पथकाचे सदस्य, अँटी-रोमियो टीम आणि पत्रकार असल्याचा बनाव करतात.


यासह, प्रेमी त्यांच्या विश्वासात येऊन त्यांच्या शोषणास बळी देखील पडल्या आहेत. बदनामीमुळे प्रेमीयुगुल कारवाईसाठी तक्रार करत नाहीत. ते महिलांचे फोन नंबर घेतात आणि त्यांना वेश्या व्यवसायात उतरण्यास  भाग पाडण्याचा प्रयत्न देखील करत. पाठविलेल्या व्हिडिओमध्ये तरुण शारीरिक संबंध ठेवताना, पैशांची मागणी आणि मारहाण करताना दिसत आहे. तसेच पीडित मुली रडताना दिसतात.

टोळीचे लोक इतके क्रूर असल्याचं दिसत आहे  की, त्या तरुण मुलींना त्यांच्या प्रियकरासह पकडतात. नंतर त्यांनी प्रथम पोलिस ठाण्यात जाण्याची धमकी दिली. त्याच वेळी ते त्यांच्या घरातील लोकांचे फोन नंबर विचारतात. यावर प्रेमीयुगुल त्यांच्याकडे विनवणी करत असतात. व्हिडिओमध्ये अनेक अल्पवयीन मुली ओरडताना दिसत आहेत. तरीही त्यांना मारहाण केली जात आहे. त्यांना संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे. एका व्हिडिओमध्ये एक तरुण जबरदस्तीने एका युवतीला खेचताना दिसत आहे, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 


महामार्गावरील काही हॉटेलमध्ये सुरु असे ब्लॅकमेलिंग
जिल्ह्यातील रानिया व जैनपूर भागात सुरू असलेल्या हॉटेल्स व ढाब्यांमध्ये वेश्या व्यवसायाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. बरेच हॉटेल्स या एकाच धंद्यावर चालत आहेत. जिल्ह्याव्यतिरिक्त कानपूर शहरातून मोठ्या संख्येने प्रेमीजोडपी येत असतात.

हॉटेल ऑपरेटर काही तास खोली उपलब्ध करुन देण्यासाठी अव्वाच्यासव्या किंमत आकारतात. भाडे महाग असल्याच्या बाबतीत ते असेही म्हणतात की, पोलिसांना मॅनेज करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. त्याचवेळी रायपूर व गजनेर परिसराच्या आसपासच्या निर्जन ठिकाणी गुंडांची टोळी सक्रिय आहे. काही हॉटेल्समध्ये ब्लॅकमेलिंगची प्रकरणेही समोर आली आहेत. त्याचप्रमाणे शिवली भागातील निर्जन भागात अशा प्रेमी जोडप्यांच्या शोधात पोलीसच फिरतात. पोलिस कर्मचारीच व्हिडिओ बनवून त्यांचे शोषण करतात. 

 

यासारख्या संघटित गुन्हेगारीचे प्रकरण संपूर्ण पुराव्यांसह सापडले आहे. आता कारवाईची आवश्यक आहे. एक अतिशय गंभीर भाग आहे. हे संपूर्ण पुरावे घेऊन कानपूर देहात एसपीकडे पाठविण्यात आले आहे. आशा आहे कीमी लवकरच अशा लोकांवर कारवाई केली जाईल. - अमिताभ ठाकूर, आयपीएस

ही बाब निदर्शनास आली आहे. काही व्हिडिओ सापडले आहेत. त्याचा तपास सीओ रसूलबादकडे देण्यात आला आहे. व्हिडिओच्या सखोल चाचणीनंतर, त्यात दिसणारे तरुण पुरुष आणि स्त्रिया यांच्यावर कारवाई केली जाईल. यानंतर फसवणूक व त्यांचे शोषण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. - केशवकुमार चौधरी, एसपी
  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल 

 

 

Web Title: Pornographic videos are made by blackmailing young girls, forcing them to have sexual relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.