The woman was forcibly drunk and gang-raped in a sugarcane field | महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

ठळक मुद्देमनकापुर पोलिस ठाण्यातून पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे एका महिलेने असा आरोप केला आहे की, गावातील चार मुलांनी जबरदस्तीने दारू प्यायला घातली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती परत तिच्या सासरच्या घरी जात असताना ही घटना घडली. सासरी जात असताना तेवढ्यातच गावातील चार मुले तिच्या मागे गेली आणि तिला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने पोलिसातसामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गोंडाच्या खोदरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी या महिलेचा आरोप आहे की, गावातील चार जणांनी तिच्यावर दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी जात होती. या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस अधीक्षक शैलेंद्र पांडे यांनी सामूहिक बलात्काराच्या घटनेची माहिती देताना सांगितले की, एक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका महिलेवर उसाच्या मळ्यात सामूहिक बलात्कार

गावातील चार मुलांनी तिच्यावर दुष्कृत्य केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ती आपल्या मेव्हण्याच्या घरी परत येत होती, मग ती सासूच्या घरी बसून मुलांसमवेत खेळू लागली. त्याचवेळी चार मुले माझ्यामागे आली. मला जबरदस्तीने उसाच्या मळ्यात नेऊन बलात्कार केला.

सामूहिक बलात्काराची नव्हे तर बलात्काराची तक्रार प्राप्त असल्याचे पोलिसांनी सांगितले

गोंडचे एसपी शैलेंद्र पांडे म्हणाले की, सामूहिक बलात्कार नव्हे तर केवळ बलात्काराचे प्रकरण त्यांच्याकडे आले. मनकापुर पोलिस ठाण्यातून पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत आरोपीला अटक केली. या महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती

 

नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

Web Title: The woman was forcibly drunk and gang-raped in a sugarcane field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.