Disgrace the relationship! Husband caught and kept sexual abusing his wife | नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार

नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार

ठळक मुद्देपत्नीच्या  फिर्यादीवरून पती व त्याच्या मित्राविरोधात शनिवारी रामानंद नगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकाराला घाबून अखेर मी त्यांच्या मित्रासमोर कपडे बदलू लागली तो मला एकदम घाणेरड्या नजरेने बघायचा, असेही महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

जळगाव : विवाहाच्या बंधनात अडकताना आयुष्यभर आपला पती आपले सरंक्षण करेल या विचारात पतीकडे जाणार्‍या पत्नीच्या मनात विचारही येऊ शकत नाही, अशी घाणेरडी व या नात्याला काळीमा  फासणारी घटना जळगावात उघडकीस आली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी या नराधमाने मित्राकरवी आपल्याच पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर अत्याचाराचा व्हिडिओ करुन तो व्हायरल करण्याची धमकी दिली. पत्नीच्या  फिर्यादीवरून पती व त्याच्या मित्राविरोधात शनिवारी रामानंद नगर पोलिसातबलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पत्नीने दिलेली फिर्यादीनुसार धुळे येथील माहेरवासीनी असलेल्या महिलेचा शहरातील एका व्यावसायिकाशी विवाह झाला. त्यांना दोन मुलेही आहेत. तिच्या पतीच्या एका मित्राचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्याने पतीने अखेर मित्रासोबत भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र आपण राहत असलेल्या परिसरात भाजीपाला विक्री करण्यास लाज वाटत असल्याने पतीने मित्राच्या भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा परिवार २० मे रोजी मित्राच्या घरात राहायला गेले. तेथे हा मित्र एकटाच रहात होता. ५ जून रोजी माझे पती माझ्याजवळ आले व म्हणाले 'तू माझ्या मित्रासमोर कपडे बदलत जा' म्हणजे त्याचा आपल्याला व्यवसायात फायदा होईल, मात्र, मला ते मान्य नव्हते. मी त्यांना नकार दिला. यावर त्यांनी मला मारहाण केली तसेच यावर मी मुलांचा जीव घेईन व स्वतःही आत्महत्या करेल, अशी धमकीही दिली. या प्रकाराला घाबून अखेर मी त्यांच्या मित्रासमोर कपडे बदलू लागली तो मला एकदम घाणेरड्या नजरेने बघायचा, असेही महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

हे तर अत्यंत धक्कादायक
८ जूनला तर पतीने कहरच केला पत्नीजवळ आला व आज रात्री थेट मित्रासोबत झोप असे सांगितले. पत्नीने नकार दिला मात्र, पुन्हा तेच मुलांना झोपेतच मारून टाकेल व तुलाही संपवेल. मी तेव्हाही नकार दिला व त्यांना धक्काबुक्की केली. यावर पती घरातून निघून गेला व कोल्ड्रींक्स घेऊन आला. व हे पी टेंशन घेऊ नको, असे सांगू लागला कोल्डीक्स पिल्यावर मात्र आपल्याला चक्कर येऊ लागले. त्यातच पतीने व त्यांच्या मित्राने पकडून मला बाथरूममध्ये नेले तिथे पतीने मला जबरदस्ती पकडून ठेवले व त्याच्या मित्राने माझ्यावर अत्याचार केला. यानंतर कोणाला काही सांगितले तर मुलांना संपवून टाकेल अशी धमकी दिली. धमक्या सुरूच होत्या. शिवाय या सर्व प्रकाराचा व्हिडिओ केला असून कोणाला काही सांगितले तर तो व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेल, अशीही धमकी दिली. प्रकृती ठिक नसल्याने पतीने १७ जुलैला मला माझ्या माहेरी सोडले. माझ्या वहिनीने तिथे मला विचारण केली असता मी सर्व प्रकार सांगितले. त्यानुसार मी माझा पती व त्याचा मित्राविरोधात फिर्याद दिल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

Web Title: Disgrace the relationship! Husband caught and kept sexual abusing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.