Woman Gang-Raped In Rajasthan, Accused Filmed Act And Posted Video Online | गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

ठळक मुद्दे“गुरुवारी (१७ सप्टेंबर) रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा एक विवाहित महिला आपल्या पुतण्यासोबत कोणालातरी पैसे उधारीवर देण्यासाठी जात होती. जेव्हा ते पैसे देऊन परतत होते, तेव्हा डोंगरावर त्यांना सहा जणांनी थांबवले, असे” कुशलसिंग, डीएसपी, तिजारा म

अलवर : अलवर जिल्ह्यात एका 45 वर्षीय महिलेवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनीही या दुष्कृत्याचे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला. “गुरुवारी (१७ सप्टेंबर) रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा एक विवाहित महिला आपल्या पुतण्यासोबत कोणालातरी पैसे उधारीवर देण्यासाठी जात होती. जेव्हा ते पैसे देऊन परतत होते, तेव्हा डोंगरावर त्यांना सहा जणांनी थांबवले, असे” कुशलसिंग, डीएसपी, तिजारा म्हणाले.

"त्यांनी महिलेशी गैरवर्तन केले आणि तिच्या पुतण्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना पळवून नेले, त्यानंतर एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला तर काहींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांनी या दुष्कृत्याचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला," असे पुढे कुशलसिंग म्हणाले. "पीडित महिलेने घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. सहा आरोपींपैकी दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे," असे ते पुढे म्हणाले. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी शोध सुरू आहे.

 


 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

Web Title: Woman Gang-Raped In Rajasthan, Accused Filmed Act And Posted Video Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.