Her husband went viral with a pornographic photo of a woman | महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती

महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती

ठळक मुद्देइंटरनेटवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याने चुकीचा वापर करून हा गुन्हा केला. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो अकोले तालुक्यातील निळवंडे येथील रहिवासी आहे.

अहमदनगर -  व्हाट्सअप ग्रुपवर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करून तिला दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी हा फिर्यादी महिलेचाच पती असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.


सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो अकोले तालुक्यातील निळवंडे येथील रहिवासी आहे. सदर बावीस वर्षीय आरोपीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या एक वर्षांपासून पत्नी त्याच्याजवळ राहत नव्हती. याच रागातून पत्नीचा बदला घेण्यासाठी आरोपीने 13 सप्टेंबर रोजी स्वतःच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या नावे घेतलेले सिमकार्ड वापरले. त्यानंतर व्हाट्सअप वर 'माझं पिल्लू माझ्यावर रुसलं' या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये त्याच्या पत्नीला ऍड केले. त्या ग्रुपवर त्याच्या पत्नीचा चेहरा असलेला फोटो व खाली नग्नावस्थेतील फोटो एडिट करून लावला. तसेच दुसरा अशाच स्वरूपाचा अश्लील फोटो फिर्यादी महिलेला पाठविला.

तसेच हे फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत सदर महिलेने 17 सप्टेंबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, विशाल अमृते, भगवान कोंडार, पूजा भांगरे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपी शिक्षण फक्त दहावीपर्यंत 
स्वतःच्या पत्नीचे अश्लील फोटो तयार करणारा निळवंडे येथील आरोपीचे फक्त दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. इंटरनेटवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याने चुकीचा वापर करून हा गुन्हा केला. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

Web Title: Her husband went viral with a pornographic photo of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.