अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल 

By पूनम अपराज | Published: September 22, 2020 09:27 PM2020-09-22T21:27:25+5:302020-09-22T21:28:01+5:30

ओशिवरा पोलीस आता पायाचा जबाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली. 

Payal finally filed a complaint against Anurag Kashyap | अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल 

अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देपायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. आज पायलने ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप चर्चेत आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. आज पायलने ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस आता पायाचा जबाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली. 

 

अनुरागने स्वत:वरचे हे सगळे आरोप नाकारले होते. त्याच्या वकीलाने एक स्टेटमेंट जारी करत, अनुरागवरचे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. त्यातच अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन सातपुते हे  अनुराग कश्यपविरोधात काल सायंकाळी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेले होते. मात्र, कोणी महिला पोलीस अधिकारी नसल्याने तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. लोकमतशी बोलताना वकील नितीन सातपुते यांनी आज रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.

संसदेत पायल घोष यांचे प्रकरण
काल रात्री एक वाजेपर्यंत लोकसभेची कार्यवाही सुरू होती. या दरम्यान गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेत अनुराग कश्यप यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अनुराग कश्यप यांचे नाव न घेता दरिंदा म्हणून संबोधित केले. ते म्हणाले की, देशातील आमच्या मुली दुर्गा देवीसारखे पूज्य आहेत, पण बॉलिवूडमध्ये असे काही लोक आहेत जे आपले नशिब उजळून टाकण्याचा दावा करतात आणि त्यांच्याशी सौदेबाजी करतात. भाजप खासदाराने या विषयावर कडक कायदा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कायद्याची भीती निर्माण होईल. २ दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी खासदार रवी किशन यांच्यावर गांजा पिण्याचा आरोप केला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 


सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

 

दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना 

 

जया साहा हिच्यावर अटकेची टांगती तलवार, NCB कडून सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी

 

 

Web Title: Payal finally filed a complaint against Anurag Kashyap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.